शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

मांग-गारूडी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार

By admin | Updated: February 3, 2016 01:57 IST

मांग-गारूडी समाजाची स्थिती फार वाईट आहे. त्यांच्याकडे जमीन नाही, विकासाची दिशा नाही. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे होऊनही समाजाची भटकंती सुरूच आहे.

पालकमंत्री बडोले : मुंडीकोटा येथे मांग-गारोडी समाजाचा मेळावा मुंडीकोटा : मांग-गारूडी समाजाची स्थिती फार वाईट आहे. त्यांच्याकडे जमीन नाही, विकासाची दिशा नाही. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे होऊनही समाजाची भटकंती सुरूच आहे. हे सर्व घडत आहे, ते फक्त शिक्षणाच्या अभावामुळेच. त्यामुळे काहीही करा, पण मुलांना शिक्षण द्या. बाबासाहेबांनी म्हटले आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मांग-गारूडी समाजाच्या सर्व समस्या शासन सोडविणार असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ते तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे मांग-गारूडी समाजाच्या वतीने समस्या मांडण्याकरिता आयोजित मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.या वेळी सभेत प्रामुख्याने माजी आ. हरीश मोरे, समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजलाल गायकवाड, तहसीलदार रविंद्र चव्हाण, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, विदर्भ अध्यक्ष नेवेलाल पाथरे, मिश्रीलाल शेंडे, सरपंच गीता नेवारे, सरपंच निर्मला भांडारकर, प्रकाश शेंडे आदी उपस्थित होते. ना. बडोले पुढे म्हणाले, मांग-गारूडी समाजाच्या जात प्रमाणपत्राकरिता जी अडचण आहे ती शासन सोडवित आहे, भटक्या समाजातील बहुरूपी, कोलाटी समाज यांच्याही याच समस्या आहेत. याकरिता एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सन १९५० च्या आधीचे दाखले मिळण्याची अट असल्याने हे दाखले मिळविताना फार त्रास होतो. त्यामुळे २८ फेब्रुवारी आधी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या माध्यमातून मांग-गारूडी समाजासाठी शिबिर घेतल्या जाईल व जातीचे प्रमाणपत्र तयार केले जातील. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे कार्ड व रेशन कार्ड तयार केल्या जातील. तसेच शिक्षित युवक-युवतींसाठी बार्टीच्या माध्यमातून शिबिर घेऊन प्रशिक्षण दिले जाणार असून नोकरीकरिता मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक भाषणात प्रकाश शेंडे यांनी समाजाच्या अनेक समस्यांबाबत माहिती दिली. या वेळी समाजाच्या वतीने ना. बडोले यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष ब्रिजलाल गायकवाड यांनीही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून अपेक्षा असल्याचे सांगत मंत्री समाजाच्या समस्या ऐकायला आल्याने समाज त्यांचा आभारी असल्याचे म्हटले.आभार विकास शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नत्थू बिसने, भाऊदास उमे, ऐकनलाल कांबळे, मेरवान कांबळे, रिगबीर उसे, राजेंद्र शेंडे, मिश्री उमे, बाबुराव शेंडे, शंकर दुनाडे, प्रभू पात्रे, धनपाल वाघमारे, काल्या दुनाडे, शिवाजी कांबळे, रमेश शेंडे, बाळू बिसेन, कपूरसिंह कांबळे, अनिल वाघमारे, दिलीप पात्रे, बाबा कांबळे, बंडू कांबळे, मनोहर शेंडे, खुशाल बिसेन, चैनलाल कांबळे, उमेश शेंडे, वामन कांबळे, सूर्यभान बिसने, ईश्वर शेंडे, जीवन उमे, अशोक कांबळे, किशोर नाडे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)