शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

समर्पित कार्यकर्ते हीच काँग्रेसची खरी ताकद

By admin | Updated: March 9, 2016 02:49 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार (दि.८) गुर्जर क्षत्रिय समाजवाडी येथे दिवसभर चालला.

गोपालदास अग्रवाल : जिल्हा काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावागोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार (दि.८) गुर्जर क्षत्रिय समाजवाडी येथे दिवसभर चालला. यात महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समिती प्रमुख, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसचे समर्पित कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे सांगितले.कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार अग्रवाल म्हणाले, आम्ही केलेली विकास कामे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्तासुद्धा जनतेसमोर मांडण्यास सक्षम आहे. आम्ही सार्वजनिक जीवनात जवळपास २४ वर्षांपर्यंत गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात केलेल्या कार्याचे जीवंत प्रमाण आहे. राजकारण करताना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून कधीही दूर समजलो नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांचे समर्थन व सहकार्य मिळून जिल्ह्यात आमची सत्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत व अनेक ग्रामपंचायतमध्ये स्थापित होवू शकली. ज्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही सत्तेत येवू शकलो, ते कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांच्या समस्या सोडविणे आपले ध्येय असायला हवे. याच कार्यकर्त्यांच्या समर्पण व त्यागामुळे काँग्रेस पक्ष विपरित परिस्थितीतही यश मिळवू शकला. केंद्र व राज्याच्या भाजप सरकारवर रोष व्यक्त करीत ते म्हणाले, अच्छे दिनच्या नावावर केंद्र सरकारने केवळ तिजोरी भरण्याचे काम केले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर १३० डॉलर प्रतिबॅरेल होते. त्या वेळी काँग्रेस शासनाने पेट्रोलचे दर ६५ ते ७० रूपयांवर स्थिर ठेवले. आता पेट्रोलचे दर कमी करून ३५ ते ४० रूपये प्रतिबॅरेलच्या दरम्यान झाले आहे. तेव्हा केंद्र शासनाची जबाबदारी जनतेला पेट्रोल २५ ते ३० रूपये प्रतिलिटर उपलब्ध करून देण्याची आहे. मात्र आज नागरिक ६० ते ६५ रूपये प्रतिलिटर पेट्रोल खरेदी करण्यास बाध्य आहेत. आतापर्यंत देश व राज्याचे शेतकरी आत्महत्या करीत होते, आता विद्यार्थ्यांनीसुद्धा हाच मार्ग पत्करला असून हे निंदनिय आहे. यावेळी त्यांनी युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात काँग्रेसशी जुळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी आ.रामरतन राऊत यांनी काँग्रेस शासनाच्या अनेक विकास कामांची माहिती दिली. जिल्हा महामंत्री तथा आदिवासी नेते सहेसराम कोरोटे यांनी बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांची पकड अजून मतबूत करण्याची गरज व्यक्त करून काँग्रेसच्या सर्व सेलने मिळून काम करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी माजी मंत्री भरत बहेकार, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, अ‍ॅड.के.आर. शेंडे, टोलसिंग पवार, जि.प. सभापती पी.जी. कटरे, पं.स. सभापती स्रेहा गौतम, डॉ. योगेंद्र भगत, डॉ. नामदेव किरसान, भागवत नाकाडे, जि.प. सदस्य उषा शहारे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे तर संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार शहर अध्यक्ष अशोक चौधरी यांनी मानले. यावेळी राजेश नंदागवळी, जि.प.सभापती पी.जी.कटरे, युकाँचे लोकसभा अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, रजनी नागपुरे, भरत बहेकार, अ‍ॅड.के.आर.शेंडे, टोलसिंह पवार, चंद्रशेखर ठवरे, झामसिंग बघेले, डॉ. योेगेंद्र भगत, राधेलाल पटले, उपस्थित होते. (प्रतिनिधी)