शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोरोना बाधितांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणीवर भर दिला जात असून रुग्ण वाढीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ही बाब दिलासादायक आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत होती. त्यामुळे रुग्णांची संख्या बरीच आटोक्यात आली. पण मागील आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. 

ठळक मुद्दे८१ बाधितांची भर : ११८ बाधितांची कोरोनावर मात 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख मागील आठवडाभरापासून उंचावत असताना मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. गुरूवारी (दि.२२) गोंदिया येथील दोन कोरोना बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११५ कोरोना बाधितांचे बळी गेले आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने थोडा दिलासा देखील मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणीवर भर दिला जात असून रुग्ण वाढीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ही बाब दिलासादायक आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत होती. त्यामुळे रुग्णांची संख्या बरीच आटोक्यात आली. पण मागील आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. गुरूवारी जिल्ह्यात ८१ कोरोना बाधितांची भर पडली तर ११८ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरूवारी आढळलेल्या ८१ काेरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ४६ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. गोरेगाव १,आमगाव २, तिरोडा १, सालेकसा ४, देवरी १, सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत ३६३८५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २७५९१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. तर ९०४९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत ७८८४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत १०५० कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. १०९ नमुन्यांचा अहवाल गोंदिया प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.१४ टक्के जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९०४९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ७८८४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.१४ टक्के आहे. तर बाधित रुग्णांचा मृत्यू दर १.२२ टक्के असून डब्लिंग रेड ५७.४ टक्के आहे.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या