सभापती निवडणुकीबाबत उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:58 PM2019-02-15T21:58:36+5:302019-02-15T22:01:07+5:30

नगर परिषद सभापतीपदासाठी शनिवारी (दि.१६) निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र मध्येच गोंदिया परिवर्तन आघाडीची बिघाडी आल्याने आता समीकरण बिघडले आहे. आघाडीमुळे अद्याप संभ्रम असून सभापती निवडणुकीला घेऊन सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Curiosity about election of the Chairman | सभापती निवडणुकीबाबत उत्सुकता

सभापती निवडणुकीबाबत उत्सुकता

Next
ठळक मुद्देआघाडीमुळे संभ्रम कायम : भाजप पूर्ण पदांना घेऊन कॉन्फिडंट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद सभापतीपदासाठी शनिवारी (दि.१६) निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र मध्येच गोंदिया परिवर्तन आघाडीची बिघाडी आल्याने आता समीकरण बिघडले आहे. आघाडीमुळे अद्याप संभ्रम असून सभापती निवडणुकीला घेऊन सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात मात्र भारतीय जनता पक्ष सर्वच पक्षांवर आपलाच सभापती बसणार याबाबत कॉन्फिडंट दिसत आहे.
नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ शनिवारी (दि.१६) संपत असल्याने नव्या सभापतींची निवड करण्यासाठी शनिवारीच बैठक बोलाविण्यात आली आहे. मागील निवडणुकीत भाजपची थोडी लापरवाही म्हणा की नशीबाची साथ म्हणा भाजपला एक जागा गमावून बांधकाम समिती सभापतीची खुर्ची कॉंग्रेसचे शकील मंसूरी यांना मिळाली. त्यानंतर आता सर्वच खुर्च्या हिसकावून घेण्यासाठी विरोधी पक्षातील राष्ट्रवादी कॉँगे्रस, कॉँग्रेस व गोंदिया परिवर्तन आघाडी हातमिळवणी करणार अशाही चर्चा सुरू होत्या.
मात्र ऐनवेळी गट नेत्याला घेऊन आघाडीत बिघाडी आली. बहूजन समाज पक्षाच्या पाच सदस्यांनी आघाडीचा गट नेता म्हणून ललीता यादव यांची निवड करून तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या पाठोपाठ गटनेता म्हणून नोंद असलेले राजकुमार कुथे यांनीही विद्यमान गटनेता तेच असल्याचे जावून कळविले. त्यामुळे आघाडीचा गट नेता कोण यावर गाडी अडकली असून संभ्रम निर्माण झाला आहे.
गट नेता निश्चित झाल्यावरच आघाडीकडून सदस्यांची नावे सूचविली जातील. शिवाय त्यानंतर काय समिकरण बनते यासाठी आता सर्वांची उत्सुकता शिगेला गेली आहे. असे असताना मात्र भाजप बिनधास्त दिसत आहे. यामुळे भाजपने यंदा चांगलीच फिल्डिंग लावून ठेवल्याचेही बोलले जात आहे.
यांची नावे आहेत चर्चेत
आघाडीत आलेल्या बिघाडीला घेऊन बसपचा गट उच्च न्यायालयात गेला होता. त्यापाठोपाठ कुथे सुद्धा उच्च न्यायालयात गेल्याची माहिती आहे. मात्र उच्च न्यायालयाने काय निर्णय सुनावला हे काही समजले नाही. मात्र असे असतानाही नगर परिषद वर्तुळात काही नावांची चर्चा सुरू झाली होती. यात बांधकाम समिती सभापतीपदासाठी विवेक मिश्रा, पाणी पुरवठा समिती वर्षा खरोले किंवा अफसाना पठाण, शिक्षण समिती मौसमी परिहार तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी नितू बिरीया यांची नावे चर्चेत होती. विशेष म्हणजे, नियोजन समिती सभापती पदावरही आघाडीतीलच दोन सदस्यांच्या नावांची चर्चा नगर परिषद वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Curiosity about election of the Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.