शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी साजरा करतात. बैलांना सजवून त्यांचे मालक आपली जोडी घेवून तोरणात जातात.

ठळक मुद्देसाधेपणाने साजरा करण्याचे आदेश : शेतकऱ्यांत निरूत्साहाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुजरुक : शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर सातत्याने कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशी अनेक संकटे पाहावयास मिळतात. तर यावर्षी कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे पोळावर संकट आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी साजरा करतात. बैलांना सजवून त्यांचे मालक आपली जोडी घेवून तोरणात जातात.गावच्या चौकात गावातील सर्व शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येवून एकमेकांना आलींगन देत गळा भेट घेतात. बैलांची पूजा व झळत्या म्हणून बैलांचे लग्न लागायचे. परंतु कोरोनामुळे पोळावर सुद्धा विरजन पडले. कोरोणामुळे शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाले. रोजगार संपले व हाताला काय नाही तर पैसा कुठून येणार.पोळानिमित्त बाजारपेठा सजल्या असल्या तरिही शेतकरी रिकामा असल्याने आपल्या सर्जा-राजासाठी काही घेऊही शकत नाही. बाजारातील साहित्ये विक्रेते सुद्धा चिंतेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यंदा सामूहिक पोळा भरणार नाही यामुळेही शेतकरी निरुत्साही आहे. कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसणाºया सर्जा-राजाचा पोळा यंदा मंगळवारी (दि.१८) आहे. वर्षभर राबराब राबणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचा असतो.एक दिवस आधी बैलांना आंघोळ करुन त्याची पूजा करुन पिठाचे लाडू खायला दिले जाते त्याला मोहबैल असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी बैलांना सजवून त्याची ओवाळणी करुन मनोभावे पूजा केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला जसा फटका बसला तसाच किंबहूना सर्वाधिक फटकाही शेतीला बसला आहे. कोरोनामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यात शेतकरी देखील अपवाद नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी