जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्याचे अर्धशतक पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:38+5:30

मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बुधवारी (दि.३) जिल्ह्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तर दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता १९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.

Corona-free half-century completed in the district | जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्याचे अर्धशतक पूर्ण

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्याचे अर्धशतक पूर्ण

Next
ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : जिल्ह्यात केवळ १९ अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याने ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक बाब आहे. मंगळवारपर्यंत एकूण ४८ कारोना बाधीत कोरोनामुक्त झाले होते तर बुधवारी (दि.३) पुन्हा दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त होणाºयाचे अर्धशतक पूर्ण झाले असून निश्चित जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बुधवारी (दि.३) जिल्ह्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तर दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता १९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.
गेल्या दहा दिवसापासून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचला आहे. त्यातच आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचे हाटस्पॉट होत असल्याने जिल्हावासीय व प्रशासनाची चिंता वाढली होती.
विशेष म्हणजे हे सर्व कोरोना बाधीत मुंबई, पुणे येथून आलेलेच आहे. तर काही नागरिक बाहेर जिल्हा आणि राज्यातून आल्यानंतर याची माहिती प्रशासनाला देत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाला सुध्दा यावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने ही थोडी दिलासादायक बाब आहे. कोरोना बाधीत रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने आत्तापर्यंत ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

सात दिवसात कोरोनामुक्त झाले ५० जण
जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित १० एप्रिल रोजी एक कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. त्यानंतर २८ मे रोजी २, २९ मे रोजी २५, ३० मे ४, ३१ मे ६, १ जून रोजी ६,२ जून रोजी ४, आणि ३ जून रोजी २ असे एकूण ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.
कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर कर्मचाऱ्यांचे परिश्रम फळाला
दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचल्याने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला होता. हे कर्मचारी दिवसरात्र कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करीत आहे. त्यांचे परिश्रम देखील फळाला आले असून त्यामुळेच आतापर्यंत ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले आहे.

Web Title: Corona-free half-century completed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.