शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया रेल्वेस्थानकावर कोरोना इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावरील खुर्च्या, रॅलिंग आणि पायऱ्यांची दिवसांतून चारवेळा साफसफाई केली जात असून जंतू नाशक फवारणी केली जात आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेच्या वर रेल्वे गाड्यांची ये-जा होते.

ठळक मुद्देदिवसभरात चारवेळा सफाई अभियान : डॉक्टरांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेसह सर्व विभाग सुध्दा अर्लट झाले असून उपाय योजना राबविल्या जात आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा कोरोना इफेक्ट दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावरील खुर्च्या, रॅलिंग आणि पायऱ्यांची दिवसांतून चारवेळा साफसफाई केली जात असून जंतू नाशक फवारणी केली जात आहे.हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेच्या वर रेल्वे गाड्यांची ये-जा होते. तर जवळपास २५ हजार प्रवाशी दररोज ये-जा करतात. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक व्यवस्थापनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.रेल्वे स्थानकावरील रॅलिंग, खुर्च्या आणि परिसर पाण्याने दिवसांतून चारवेळा धुतले जात असून जंतूनाशक फवारणी केली जात आहे. तसेच संशयीत रुग्ण आढळल्यास त्याची तपासणी करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ विशेष कक्ष उघडण्यात आले आहे. तसेच तिथे दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोरोनाची लक्षणे आढळणाºया रुग्णाला या कक्षात पाठवून तपासणी केली जात आहे. रेल्वे रुग्णालयात सुध्दा पाच खाटांचे विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर आणि जिंगलच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.त्यामुळे सुरूवातीला कोरोना जनजागृती प्रती उदासिन असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर कोरोना इफेक्ट दिसून येत आहे.आरक्षण तिकीट रद्द करण्याचे प्रमाण वाढलेकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे केलेले नियोजन आता रद्द केले. एप्रिल महिन्यासाठी केलेले आरक्षण रद्द करण्यासाठी येथील रेल्वे आरक्षण केंद्रात दररोज प्रवाशांची गर्दी वाढत आहे.सोमवार आणि मंगळवारी या दोन दिवसात ६ लाख रुपयांच्या जवळपास ६ आरक्षीत तिकीट रद्द करण्यात आले. तर आरक्षण करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.दररोज अडीचशे आरक्षण तिकीटे रद्द होत असल्याची माहिती रेल्वे विभागाचे मुकेश कुमार यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस