शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

वजन काटा विक्रेत्याला ग्राहक न्यायमंचचा झटका

By admin | Updated: December 7, 2014 22:52 IST

वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली.

गोंदिया : वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. मंचाने आपल्या न्याय निवाड्यात नुकसान भरपाईसह वजन काट्याची किंमत परत करण्याचे आदेश देत ग्राहकाला दिलासा दिला.
सडक/अर्जुनी तालुक्याच्या फुटाळा येथील रहिवासी चत्रुगण गणपत ब्राह्मणकर असे तक्रारकर्त्याचे नाव असून त्याचे गावातच जान्हवी किराणा स्टोर्स आहे. त्यांनी गोंदियाच्या देशबंधू किर्ती इंन्टरप्रायजेसचे संचालक मुकेश भोजवानी यांच्याकडून इलेक्ट्रानिक वजन काटा ७ जानेवारी २०१३ रोजी चार हजार ५०० रूपयांत खरेदी केले. २० फेब्रुवारी २०१३ रोजी त्यात बिघाड झाल्याचे त्यांनी दूरध्वनीवरून कळविले. भोजवानी यांनी दखल न घेता वजन काटा दुरूस्त करून न देता सेवेत त्रुटी केली. यानंतर ग्राहक ब्राह्मणकर यांनी त्यांना पत्र पाठवून दुरूस्तीची मागणी केली, तसेच वैधमापन शास्त्र यांनासुद्धा पत्र पाठविले. मात्र दखल घेण्यात न आल्याने त्यांनी १२ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून ९ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायमंचात तक्रार दाखल केली.
यानंतर मंचामार्फत नोटीस पाठविल्यावर किर्ती इंटरप्रायजेसचे संचालक भोजवानी यांनी हजर होवून लेखी जबाब नोंदविला. त्यात ग्राहक ब्राह्मणकर यांनी ७ जानेवारी २०१३ रोजी ३० किलो क्षमतेच्या वजन काट्याची तोंडी मागणी चार हजार ५०० रूपयांत केली होती. त्याआधारे एक हजार ४५० रूपयांचा जुना वटन काटा व एक हजार ५० रूपये रोख दिले होते. उर्वरित दोन हजार रूपये १६ जानेवारी २०१३ रोजी देण्याचे ठरले होते.
मात्र त्या दिवशी रूपये न देता त्यांनी २६ जानेवारी २०१३ रोजी दिले. त्यानंतर बिघाड झाल्याचे कळविल्यावर दुकानातील अभियंत्याला १२ जानेवारी व १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र बाह्मणकर एकदा शेतात तर दुसऱ्यांदा बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांना दूरध्वनीवरून काटा प्रयोग शाळेत आणल्यावरच दुरूस्त होईल किंवा रक्कम परत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी प्रयोगशाळेत काटा आणलाच नाही, असे म्हटले.
दोन्ही पक्षांचे कागदपत्रे व युक्तिवाद ऐकूण न्यायमंचाने कारणमीमांसा केली. ब्राह्मणकर यांनी दुरूस्तीची मागणी केल्यावरही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. शिवाय ते अपंग असल्यामुळे कुठे जावू शकत नाही.
यावरून कीर्ती इंटरप्रायजेसने सर्व प्रकारे टाळाटाळ करून न्यूनतापूर्ण अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला. शिवाय अभियंत्याला तक्रारकर्ते ब्राह्मणकर यांच्या घरी वजनकाटा दुरुस्तीसाठी पाठविले, ही बाब सिद्ध करण्यासाठी किर्ती इंटरप्रायजेसने अभियंत्याचे शपथपत्र किंवा कोणतेही दस्तऐवज आदी पुरावे दाखल केले नाही. त्यामुळे सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे न्यायमंचाने सांगितले.
यावर न्यायमंचाने ग्राहक ब्राह्मणकर यांची तक्रार अंशत: मान्य करून इलेक्ट्रानिक वजन काटा परत घ्यावा व त्याची किंमत चार हजार ४५० रूपये द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानभरपाई म्हणून ती हजार रूपये द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने किर्ती इंटरप्रायजेसच्या संचालकांना दिले. (प्रतिनिधी)