शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी कायद्यांची निर्मिती

By admin | Updated: March 11, 2016 02:22 IST

लहानपणापासूनच आई-वडिलांनी आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना रूजविणे गरजेचे आहे.

गोंदिया : लहानपणापासूनच आई-वडिलांनी आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना रूजविणे गरजेचे आहे. मुलींना योग्य शिक्षण दिल्यास ती आपल्या पायावर उभी राहू शकते. यातूनच अत्याचारास प्रतिकार करण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये निर्माण होते. समाजाची मुलींबद्दलची मानिसकता सकारात्मक असली पाहिजे. त्यांना योग्य शिक्षण मिळाल्यास त्यांच्यावर अत्याचार होणार नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठीच महिलाविषयक कायदयाची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी केले. जिल्हा न्यायालय येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी न्या. गिरटकर होते. अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सदस्य सचिव तथा मुख्य न्यायदंडाधिकारी प्र.ह. खरवडे, न्या. माधुरी आनंद, सविता बेदरकर, टी.बी. कटरे, बीना बाजपेयी उपस्थित होते.न्या. खरवडे यांनी, कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैगिक शोषण याविषयावर माहिती दिली. कोणत्याही कामाच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतील तर महिलांनी स्थापन असलेल्या समतीसमोर तक्रार केल्यास अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कारवाई करण्यात येते. तेव्हा महिलांनी न घाबरता होत असलेला अत्याचाराचा प्रतिकार करावा, असेही त्यांनी सांगितले. न्या. आनंद यांनी महिलांचे कौटुंबीक हिंसाचारापासून संरक्षण कायदा व हुंडाप्रतिबंध कायदा याबाबतची माहिती दिली. हुंडा देणारा व घेणारा दोघेही शिक्षेस पात्र असून अशा प्रकारचे देवाण-घेवाण करू, नये असे विचारही त्यांनी मांडले. प्रा. सविता बेदरकर यांनी, बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी कराटे शिकणे गरजेचे आहे असे सांगून त्या म्हणाल्या, जेवढे ब्युटी पार्लर आहे तेवढेच कराटे क्लासेस उघडणे गरजेचे आहे, असे सांगितले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष डॉ.पी.बी. कटरे यांनी महिलांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रबळतेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात जिल्हा न्यायालयाच्या व्यवस्थापक नलिनी भारद्वाज, जे.सी.आय. संघटना, रोटरी क्लबच्या महिला सभासद, विधी विभागातील विद्यार्थिनी, नमाद महाविद्यालयाच्या विधी विभागातील प्रा. अश्विनी दलाल व न्यायालयातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे महेंद्र पटले, शिवदास थोरात, कपिल पिल्लेवान, आर्यचंद्र गणवीर यांनी सहकार्य केले. संचालन शबाना अंसारी यांनी केले. आभार जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष सुनिता पिंचा यांनी मानले.