शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण अशक्यच, लसीकरणासाठी लागणार पुन्हा दीड वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५६ हजार ४५६ असून, यात १८ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण हे १० लाखांवर आहे. म्हणजेच १० लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ४६ हजार ८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. म्हणजेच एकूण २५ टक्के लसीकरण झाले आहे. अद्यापही ७ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण होणे शक्य आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत दोन लाख ४६ नागरिकांचे लसीकरण : लसीच्या तुटवड्याने लागतोय वारंवार ब्रेक

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हेच प्रमुख शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर केंद्रित आहे. लसीकरणाला नागरिकांचा व्यापक प्रतिसाद मिळावा यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५६ हजार ४५६ असून, यात १८ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण हे १० लाखांवर आहे. म्हणजेच १० लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ४६ हजार ८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. म्हणजेच एकूण २५ टक्के लसीकरण झाले आहे. अद्यापही ७ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण होणे शक्य आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबरपर्यंत ५ लाख नागरिकांचे लसीकरण होण्याची शक्यता असून, संपूर्ण लसीकरणासाठी पुन्हा दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, तर आज, सोमवारपासून जिल्ह्यातील एकूण १४० केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाला लसींचा  साठा सुद्धा प्राप्त झाला आहे. सद्य:स्थितीत 

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचे काय?- लसीकरणासाठी शासनाकडून होणारा लसींचा पुरवठा लक्षात घेता ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसींचा पुरवठ्यात वाढ झाल्यानंतर १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.- कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मात्र, १८ वर्षांखालील बालकांना लसीकरण करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. - १८ वर्षांखालील बालकांना लसीकरण करण्यासाठी सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. -  जिल्ह्यात १८ वर्षांखालील बालकांची संख्या अडीच लाखांवर आहे. शाळांचे शैक्षणिक सत्र लक्षात घेता त्यांचेसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची गरज आहे.  

आधी केवळ ४५ केंद्रे, आता १४० कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण व्हावे यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी जिल्ह्यात केवळ ४५ केंद्रे होते. मात्र, लसीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी १४० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवरून दररोज पाच ते सहा हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. 

जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने सध्या लसीकरणाचे टार्गेट पुढे ठेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. आतापर्यंत अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण केंद्राची संख्या वाढवून लसीकरणाला गती देण्यात येईल. तसेच नागरिकांनी सुद्धा लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे. दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या