शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सर्व विभागांसाठी भरीव तरतूद

By admin | Updated: February 7, 2015 23:26 IST

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये सन २०१४-१५ चा सुधारित व २०१५-१६ चा संभाव्य अर्थसंकल्प

जि.प.चा अर्थसंकल्प : पाणी पुरवठा व शिक्षण विभागावर नाराजीगोंदिया : जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये सन २०१४-१५ चा सुधारित व २०१५-१६ चा संभाव्य अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे यांनी सादर केला. तो सर्वसंतीने मंजूर करण्यात आला. नवीन आर्थिक वर्षाकरिता सर्व विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली.या सभेमध्ये सदस्यांनी शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि पाणीपुरवठा योजनेच्या चालढकल धोरणावर चांगलीच टीका करीत चिंता व्यक्त केली.सुरवातीलाच जि.प.चे माजी उपाध्यक्ष व शिक्षण सभापती विनोद अग्रवाल यांनी जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणाचा स्तर खालावल्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. यापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग राज्यात अव्वल होता. मात्र गावची शाळा-आमची शाळा हा धोरणात्मक प्रकल्प यशस्वीपणे सुरु असतानाही शिक्षण विभागाच्या प्रगतीचा आलेख मात्र चिंताजनक असून याला शिक्षण विभागाचे अधिकारी जबाबदार असून याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. याच विषयाला धरुन अन्य सदस्यांनीही या विभागावर टीका करीत येणाऱ्या काळात सुधारणा न केल्यास खाजगी इंग्रजी शाळा, गावागावात दिसतील व जि.प.च्या शाळा बंद होतील, अशी चिंता व्यक्त केली. ज्ञानदानाव्यतिरिक्त खाजगी कामे करणाऱ्या शिक्षकांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. सदस्यांनी केली. उमाकांत ढेंगे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची योग्य मार्गानी अंमलबजावणी होत असून गावकऱ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीला चालवायला दिलेली योजना अपूर्ण यंत्रणा व निधीच्या कमतरतेमुळे राबविणे फार कठीण असून अनेक योजना रेंगाळून बंद पडल्या असल्याने जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात याव्या, अर्जुनी-मोरगाव, खांबी व सिरेगाव-रामपुरी या चार पाणीपुरवठा योजनांकरीता त्वरीत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.यासंदर्भात अरविंद शिवणकर व इतर सदस्यांनीही या योजनेवर चिंता व्यक्त करुन पाणीपुरवठा योजनेकरीता पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विशेष निधींची मागणी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यास सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या परवानगीने अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे यांनी वर्ष २०१४-१५ चा सुधारित व २०१५-१६ चा संभाव्य अर्थसंकल्प सादर केला. यात बांधकाम विभागांतर्गत जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्राच्या विकासाकरीता प्रत्येकी १.५० लाख, दुकान गाळ्याच्या बांधकामासाठी १ कोटींची तरतुद, गावची शाळा-आमाची शाळा या प्रकल्पासाठी २० लाख रुपयांची, सामान्य प्रशासन विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दोनचाकी सायकल, इलेक्ट्रिक मोटार, मागासवर्गीय बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी बँड संचचा पुरवठा, मागसवर्गीय महिलांना पिकोफॉल/शिलाई मशीन, वसतिगृहातील मुलांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान, अशा अनेक बाबींवर ३१.५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.अपंगांना तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, संगणक प्रशिक्षण आदींवर १८.२४ लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी विविध कामांसाठी ३५. ६५ लाख, कृषी विभागासाठी ५५.२८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सभेला जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी व संबंधित विभागाने विभागप्रमुख उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)