शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गुटखाबंदीसाठी समित्यांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: October 16, 2014 23:27 IST

केवळ तंटे मिटविणे हा तंटामुक्त समित्यांचा उद्देश नसून, संपूर्ण अभियान राबविताना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे हे देखील महत्वाचे भाग आहे. शासनाने एकूण १० प्रकार निश्चित केलेत.

अर्जुनी/मोरगाव : केवळ तंटे मिटविणे हा तंटामुक्त समित्यांचा उद्देश नसून, संपूर्ण अभियान राबविताना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे हे देखील महत्वाचे भाग आहे. शासनाने एकूण १० प्रकार निश्चित केलेत. त्यामध्ये व्यसनमुक्तीला प्राधान्य दिले आहे. गावातील दारुधंद्याबरोबर १०० टक्के गुटखाबंदी करणे गरजेचे आहे. गावपातळीवर तंटामुक्त समित्यांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्यााचे मत तंटामुक्त समित्यांच्या संघाने व्यक्त केले.राज्यात गुटखाबंदी असली तरी चोरट्या मार्गाने तो मिळतोच. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत तंबाखू किंवा गुटखा सेवन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अगदी १५ ते १६ वर्षांच्या युवकांपासून ५० ते ५५ वयोगटातील मंडळी गुटखा सेवन करतात. शासनाला गुटख्यामुळे सुमारे १०० कोटींच्या महसूल प्राप्त होत होता. परंतु, सार्वजनिक आरोग्याच्या हितार्थ महसुलावर पाणी सोडून गुटखाबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. अन्न व औषध प्रशासनाकडून देखील लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त करुन जाळून नष्ट करण्यात आला. शासकीय पातळीवर गुटखाबंदी मोठ्या प्रमाणात सुरु असताना छुप्या पद्धतीने किंवा चोरुन गुटखा विक्री करण्यात येते. दिवसाला पाच पंचवीस गुटख्याच्या पुड्या सेवन करणाऱ्यांना गुटखा सेवनाशिवाय जगणे मुश्कील होऊ लागले. त्यामुळे सेवन करणाऱ्यांची मागणी लक्षात घेता चोरीने, छुप्या पद्धतीने विक्री होऊ लागली. ठरावीक ग्राहक टोपण नावाने गुटख्याची मागणी करतात. नियमित ग्राहक ओळखून त्याची विक्री करण्यात येते. शासनाकडून व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबविताना त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु ती होत नाही हीच खरी शोकांतिका असल्याचा सूर या संघाने व्यक्त केला आहे. गावोगावाच्या तंटामुक्त समित्यांनी चोरीने किंवा छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांना पकडून विक्री बंद करणे गरजेचे आहे. जेणेकरुन भावी युवा पिढीचे भवितव्य सुरक्षित राहील. काही पैशासाठी दुकानदार गुटख्यासारख्या तत्सम वस्तूंची विक्री करतात. जेणेकरुन युवकांचे-तरुणांचे आरोग्य धोक्यात येते. त्यापेक्षा संबंधित दुकानदारांना तंटामुक्त समित्यांनी योग्य मार्गदर्शन केले तर तेही व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. याशिवाय गावामध्ये आरोग्याशी निगडित वैद्यकीय अधिकारी किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन करुन प्रबोधन करण्याची तितकीच गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)