शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ककोडी अद्याप दहशतीच्या सावटात

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

विषबाधेने येथील चिमुकल्याचा जीव गेला असतानाच गावातील काही रूग्णांना परत उपचारासाठी भर्ती करण्याची पाळी आली आहे.

पालकमंत्री, खासदारांची भेट : ककोडी व चिल्हाटी येथे शिबिरककोडी : विषबाधेने येथील चिमुकल्याचा जीव गेला असतानाच गावातील काही रूग्णांना परत उपचारासाठी भर्ती करण्याची पाळी आली आहे. यामुळे ककोडीतील गावकरी अद्याप दहशतीच्या सावटातच वावरत आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मृत मुलाच्या घरी भेट दिली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात भर्ती रूग्णांची विचारपूस केली. तसेच खा.अशोक नेते यांनीही गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.या घटनेमुळे ककोडी व चिल्हाटी येथे आरोग्य शिबीर सुरूच आहे. मंडईत मिठाई व गुपचूप खाल्याने येथील महेश कपूरडेहरिया (१२) या चिमुकल्याचा गुरूवारी (दि.१७) मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर शेकडोंच्या संख्येत लोकांना विषबाधा झाल्याने या परिसरात खळबळ माजली आहे. विषबाधेने चिमुकल्याचा जीव गेल्याने आरोग्य विभागात हडकंप माजला असून ककोडी व चिल्हाटी येथे आरोग्य शिबीर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवारीही (दि.१९) चार रूग्णांना परत भर्ती करण्यात आल्याने येथील नागरिकांत धडकी भरली आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व आमदार संजय पुराम यांनी शनिवारी (दि.१९) मृत महेशच्या घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले व आर्थिक मदत केली. तर आमदार पुराम यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले. पश्चात त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन भर्ती रूग्णांची विचारपूस केली. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुष्यंत हुमणे यांना वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन रूग्णांवर उपचार करण्यास सांगीतले. (वार्ताहर)पाण्याचे नमुने घेतले पाण्यामुळे घडलेल्या या प्रकाराची दखल घेत आरोग्य विभागाकडून चिल्हाटी, ककोडी, मुरमाडी, तुमडीकसा, वडेकसा, धवलखेडी व गणूटोला येथे आरोग्यसेविकांच्या माध्यमातून गावकऱ्यांना औषध देण्यात आले. तसेच या गावांतील पाण्याच्या स्रोतांमधून नमुने घेण्यात आले आहेत. गावात अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत लक्ष ठेवून आहेत. तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुष्यंत हुमणे हे सुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.