शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
4
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
5
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
6
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
7
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
8
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
9
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
10
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
11
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
12
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
13
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
14
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
15
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
16
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
17
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
18
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
20
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘मायनस मार्किंग’ पद्धत बंद करा

By admin | Updated: December 6, 2014 01:52 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षांत आता मायनस मार्किंगची पद्धत सुरू करण्यात आली आहे.

गोंदिया : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षांत आता मायनस मार्किंगची पद्धत सुरू करण्यात आली आहे. याबाबत पूर्व माहिती न देता विद्यार्थ्यांची मायनस मार्कींग करण्यात आल्याने फक्त सहा टक्के निकाल लागला आहे. अशात मायनस मार्किंगची ही पद्धत त्वरीत बंद करण्याची मागणी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी निवासी उप जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना ४ डिसेंबर रोजी निवेदन दिले.
यापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांत मायनस मार्किंगची पद्धत नव्हती. तर प्रथम सत्र परीक्षेपर्यंत ही पद्धत अंमलात नव्हती. आॅगस्ट २०१४ च्या सिलॅबसनुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याच्या प्रश्नपत्रिकेवरही याबाबत नोंद नव्हती. मात्र मायनस मार्किंग करण्यात आली व परिणामी येथील प्रशिक्षण संस्थेचा निकास फक्त सहा टक्के लागला. एकीकडे शासन औद्योगिक प्रशिक्षणाला महत्व देत तरूणांना याकडे वळण्याचे आवाहन करीत आहे. तर दुसरीकडे मायनस मार्किंगचा प्रकार सुरू केला जात आहे.
विशेष म्हणजे आठवी पास विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचे प्रशिक्षण घेता येत नसताना शासनाने त्यांना वेल्डर, वायरमन व कारपेंटरचे प्रशिक्षण उपलब्ध करविले. आता त्या आठवी पास विद्यार्थ्यांना मायनस मार्किंग केल्यास त्यांचे प्रशिक्षण पूर्ण कसे होणार असा सवाल येथील विद्यार्थी करीत आहेत. इंजिनियरींग व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात मायनस मार्किंग होत नाही. तसेच आयटीआयचा विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत पोहचू शकत नाही. असे असताना मात्र त्यांनाच मायनस मार्किंग सुरू करण्यामागचे शासनाचे धोरण काय ते निश्चित होत नाही. करिता आयटीआयमध्ये सुरू करण्यात आलेली मायनस मार्किंगची ही पद्धत त्वरित बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी सुमारे २०० विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वालस्कर यांना निवेदन दिले. तसेच ही पद्धत त्वरीत बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)