शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजनडोंगरी जंगलातील वृक्ष कटाई बंद करा

By admin | Updated: November 22, 2014 23:05 IST

वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ सालई हलका गट क्रमांकाच्या जागेवरील ६६.५० हेक्टर पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपूर्ण कटाई करण्याची शासनाकडून

देवरी : वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ सालई हलका गट क्रमांकाच्या जागेवरील ६६.५० हेक्टर पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपूर्ण कटाई करण्याची शासनाकडून परवानगी घेऊन सदर जंगल कटाईला मागील १४ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली. मात्र या जंगल कटाईला राजनडोंगरी जंगल परिसरातील ९० टक्के आदिवासी लोकांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीकोणातून बंद पाडले आहे. या राजनडोंगरी गावातील आदिवासी लोकांच्या मते सन १९९० पासून सदर जंगल वनविभागाने वनविकास महामंडळाला सुपूर्द केले. तेव्हापासून या जंगलात दोन वेळा वनिकरणाच्या विविध योजनेंतर्गत या जंगलाची चापल कटाई करून या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन झाडे लावण्यात आली होती. आता यावेळी सुद्धा संपुर्ण जंगलात चापल कटाई करण्याचा सपाटा १४ नोव्हेंबरपासून वनविकास विभागाने लावला आहे. त्यानुसार राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ मधील ६६.५० हेक्टर जागा पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपुर्ण चापल कटाई करण्याची शासनाकडून परवानगी घेऊन येथील वनविकास विभागाकडून सदर जंगल कटाईला मागील १४ नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.सदर गावातील झाडाची कटाई गावातील आदिवासी लोकांच्या पुढाकाराने पर्यावरणाच्या रक्षणाकरिता बंद पाडण्यात आली आहे. या गावच्या लोकांच्या मते सदर जंगल कटाई करण्याकरीता ग्रा.पं. नकटी किंवा वन हक्क समिती पदाधिकाऱ्यांना विचारपुस करुन परवानगी घेतली नाही. तसेच यांचे म्हणणे ऐकले नाही. तसेच या जंगलात वनिकरण केल्यानंतर आमच्या घरची गुरे-ढोरे चरायला कुठे नेणार? आमच्या गावच्या लोकांना ईमारतीसाठी लाकडे लागल्यावर आणायची कुठून असा प्रश्न उपस्थित केला. जर या जंगलात वनिकरण करायचे असेल तर खुल्या जागेवर करावे. आम्ही फक्त झाडे तोडण्यास व कटाई करण्यास मनाई करीत आहो. केंद्र सरकार व राज्य सरकार पर्यावरणाच्या संरक्षणाकरीता विविध योजने द्वारे झाडे लावा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करा असे म्हणते. तर जीवंत मोठी झाडे कापून त्या जागेवर वनिकरन करा असे सांगत नाही. परंतु वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी असे कृत्य कशासाठी करीत आहेत हे कळत नाही.आता या जंगलातील सागवन जातीचे दोन झाड, ककईचे तीन, बिजाचे तीन, मोवईचे दोन, गराडीचे सात, सिहनाचे दोन, भेराचे तीन आणि धावडा जातीचे एक अशी २३ झाडे कापून बीट तयार करण्यात आले आहे. याबाबद राजनडोंगरीवासीयांनी ग्रा.पं. नकटी, वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले आहे.