कोरोना संक्रमणात नागरिक फिरतात बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:18+5:30

भाजीपाला बाजार, गावातील दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत आहेत. या गर्दीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष घातले नाही. तर कोरोना विषाणू मोठे रौद्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Citizens walk around in the corona transition without hesitation | कोरोना संक्रमणात नागरिक फिरतात बिनधास्त

कोरोना संक्रमणात नागरिक फिरतात बिनधास्त

Next
ठळक मुद्देदंडात्मक कारवाईची गरज : स्थानिक समित्यांनी घ्यावी दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : जिल्ह्यातील शहराप्रमाणे खेड्यामध्ये सुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असताना लॉकडाऊन शिथिल केल्यापासून नागरिकांच्या मनात कोरोना विषाणू संबंधी भीती, चिंता असताना देखील नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आदीकडे दुर्लक्ष करुन बिनधास्त फिरताना दिसत आहेत. भाजीपाला बाजार, गावातील दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत आहेत. या गर्दीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष घातले नाही. तर कोरोना विषाणू मोठे रौद्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हे परिसर जिल्ह्यापासून दूर असले तरी लॉकडाऊन शिथिल केल्यापासून नागरिक बिनधास्त फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता व मास्कचा वापर न करता विनाकारण इकडून तिकडे फिरताना दिसत आहेत. दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची नागरिकांच्या मनात भीती, चिंता निश्चित आहे. महत्त्वाचे काम नसताना सुद्धा गावातील दुकांनामध्ये भाजीपाला बाजारामध्ये नागरिक गर्दी करीत आहे. हे नियम मोडणाऱ्यांमध्ये सुशिक्षीत वर्गाचा अधिक समावेश आहे.
या लोकांना कोरोनाच्या परिणामाची जाणीव असताना सुद्धा अत्यंत बेजबाबदारीने वागत आहेत. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसून अशा नियम मोडणाºया लोकांकडून दंड वसूल करणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीने निर्माण केलेली गाव कोरोना निर्मूलन समितीची कार्य थंडावण्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गावात विना मास्क फिरणाºयांची संख्या वाढली आहे. गावातील रस्त्यावर प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. यामुळे कोरोना विषाणू मोठे रौद्ररुप धारण करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Citizens walk around in the corona transition without hesitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार