शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आयसीआयसीआय विमा कंपनीला ग्राहक मंचची चपराक

By admin | Updated: September 18, 2014 23:36 IST

शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली.

गोंदिया : शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली. सदर कंपनीला आता एक लाख रूपयांसह तक्रारींचा व इतर खर्चही द्यावा लागणार आहे. गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील रहिवासी आळकन पटले यांचे पती दुलीचंद लोंढू पटले हे शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना तोल जावून पडले. त्यात त्यांचा ५ आॅक्टोबर २००५ त्यांचा मृत्यू झाला. पटले यांनी तहसीलदारांमार्फत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा प्रस्ताव आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडे सादर केला. कंपनीने प्रस्ताव मंजूर-नामंजूर काहीही न कळविल्याने वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. मात्र विमा दावा निकाली न लागल्याने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात प्रकरण २० जून २०१२ रोजी दाखल करण्यात आले. मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर सदर कंपनीच्या व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकांचे लेखी जबाब दाखल करण्यात आले. तत्कालीन तहसीलदार हजर झाले नसल्याने प्रकरण एकतर्फीच चालविण्यात आले. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने आपल्या जबाबात सदर तक्रार मुदतीत दाखल न केल्यामुळे व संपूर्ण कागदपत्रे न दिल्यामुळे ती खारीज करण्याची विनंती केली. मात्र अळकनबाई यांनी ५ एप्रिल २००६ रोजीच विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबतचे गोरेगाव पोलीस ठाण्याची मर्ग सूचना, उत्तरीय तपासणी अहवाल, मृत्यूचा दाखला, सात-बाराचा उतारा, वारसान प्रमाणपत्र, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व पोस्टाची पावती आदी कागदपत्रे तक्रारीसह दाखल केली होते. आळकनबाईचे वकील अ‍ॅड.उदय क्षीरसागर यांनी सर्व पुरावे सादर केले. विमा कंपनीचे वकील सचिन जायस्वाल यांनी लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजावा, अशी लेखी सूचना २५ फेब्रुवारी २०१३ रोजी दाखल केली. तसेच तोंडी युक्तीवादासाठी वारंवार संधी देवूनही विरूद्ध पक्षाचे वकील गैरहजर राहीले. त्यामुळे न्यायमंचाने कारणमिमांसा करून तोल जावून विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सिद्ध होते, असे सांगितले व आळकनबाईची तक्रार मान्य केली. त्यानुसार सदर विमा कंपनीने शेतकरी अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये, मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून ९ टक्के दराने व्याज, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने दिला. (प्रतिनिधी)