शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

दावा नाकारणार्‍या विमा कंपनीला चपराक

By admin | Updated: June 9, 2014 23:41 IST

शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्‍याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला.

गोंदिया : शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या आयसीआयसीआय  लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्‍याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला.
तालुक्यातील महारिटोला येथे उमराव पंधरे यांची पत्नी रैनाबाई पंधरे यांचा १५ नोव्हेंबर २00५ रोजी पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. हा त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकरी अपघआत विमा योजनेनुसार, आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडे १ लाख रुपये मिळण्यासाठी सर्व कागदपत्र सुपूर्त केले. परंतु विमा कंपनीने तो दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याचे त्यांना कळविले नाही. त्यामुळे मृत महिलेचा मती गजानन पंधरे यांनी विम्याचे एक लाख रुपये द.सा.द.शे. १८ टक्के व्याजासह व झालेल्या त्रासाचे १0 हजार आणि आतापर्यंत आलेल्या खर्चाचे १0 हजार मिळण्यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे धाव घेतली.
विमा कंपनीने आपली बाजू स्पष्ट करताना घडलेल्या घटनेचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे तक्रारकर्त्यांचा हा विमा प्रलंबित ठेवण्यात आल्याचे सांगितले. परंतु तक्रारकर्त्यांचे वकील अँड.उदय क्षीरसागर यांनी मंचापुढे आपली बाजू मांडताना तक्रारकर्त्यांच्या पत्नीचा मृत्यू हा पुराच्या पाण्यात बुडूनच झाला हे सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावर तक्रारकर्ता व विरोधी पक्षाची बाजू ऐकूण घेत न्यायमंचाने तक्रारकर्त्यांस शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत एक लाख रुपये व तक्रार केल्याच्या दिनांकापासून ते आतापर्यंत संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. १0 टक्के दराने द्यावे, एवढेच नव्हे तर झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये व आतापर्यंत झालेला खर्च तीन हजार रुपये हे सर्व आदेश दिल्यापासूनच्या ३0 दिवसात देण्यास सांगितले. यामुळे मृत शेतकर्‍याच्या वारसांना दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)