शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचे शतक पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

दोनदा कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात १२ जूनला दुबईहून आलेल्या नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर आठ दिवसांच्या कालावधीतच कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर पोहचला होता.मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने यापैकी बरेच रुग्ण कोरोनामुक्त होवून आतापर्यत घरी परतले आहे.जिल्ह्यात मार्च ते २५ जूनपर्यंत एकूण १०४ कोरोना बाधित रुग्ण आढळले.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : आता केवळ चार कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या १८ कोरोना बाधितांपैकी गुरुवारी (दि.२५) १४ जण कोरोनामुक्त झाले. तर नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत शंभर कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या स्थितीत जिल्ह्यात केवळ चार अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.दोनदा कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात १२ जूनला दुबईहून आलेल्या नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर आठ दिवसांच्या कालावधीतच कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर पोहचला होता.मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने यापैकी बरेच रुग्ण कोरोनामुक्त होवून आतापर्यत घरी परतले आहे.जिल्ह्यात मार्च ते २५ जूनपर्यंत एकूण १०४ कोरोना बाधित रुग्ण आढळले.यापैकी गुरूवारपर्यंत शंभर कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे सध्या स्थितीत केवळ ४ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार कोरोना बाधितांवर उपचार करित असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दहा दिवसात गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. गुरूवारी कोरोनामुक्त झालेल्या १४ जणांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.यावेळी कोविड केअर सेंटरमधील सर्व डॉक्टरांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच सुटी देण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन करुन घरी गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत माहिती दिली.आत्तापर्यंत २१३५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २२३९ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर २१३५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर ११९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने ही दिलासादायक बाब आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या