शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिवस उत्साहात

By admin | Updated: March 9, 2016 02:54 IST

जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच सुजीत येवले यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

रावणवाडी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि.८)जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच सुजीत येवले यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपसरपंच कैलाश कुंजाम, कौशल लिल्हारे, कल्पना लिल्हारे, उर्मिला फसफासे, लीना गजभिये, सुरेखा बिसेन, सरिता न्यायकडे सुरेखा उपासे व रेखा हरिणखेडे, मानीक उके, खेमचंद हरिणखेडे उपस्थित होते.गोंदिया : जेतवन बुद्ध विहार समितीच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करुन दीप प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी महिलांनी पुष्प अर्पण केले. ललिता बोंबार्डे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आजची स्त्री, नवीन आव्हान पेलण्याची शक्ती, बदलते सांस्कृतिक जीवन, बदलती कार्यशक्ती, बदलते वास्तविक मूल्य, मैत्रिय भाव याविषयी मार्गदर्शन केले. बाराभाटी : महिलांना मिळणारे हक्क, स्वातंत्र्य व अधिकार हे भारतीय संविधनामुळे मिळाले आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जागे होणे महिलांसाठी आवश्यक असलयाचे प्रतिपादन अ‍ॅड.प्रांजली भांडारकर यांनी केले. येथे आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वीणा नानोटी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती हवेले, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पौर्णिमा शहारे, नगराध्यक्ष डॉ. मेघा गाडेकर, जयश्री काशीवार, गीता ब्राम्हणकर, अनुजा पाटी, सी.एस. घाटे आदी महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. गाडेकर यांनी, महिलांनी आरोग्यबाबत कशी दखल घ्यावी, काळजी कशी घ्यायची यावर मार्गदर्शन केले. तर उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. संचालन करून आभार नेहा कापगते यांनी मानले. शिरपूरबांध : ग्राम पंचायत कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच मदनसिंग पुंडकी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं.सदस्य अनुकला कोडापे, गजानन शिवणकर, किरण मेश्राम, अंगणवाडी सेविका रुपा देशमुख व माजी ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. अध्यक्षांनी आपल्या भाषणात महिलांच्या स्थितीविषयी व त्यांच्या अधिकार कर्तव्याबाबत जागृत राहावे असे सांगितले.