गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:06+5:30

क्वालीस या वाहनातून पुयार मार्गे इटखेडा गावाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली. यावर पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी लगेच सहायक पोलीस निरीक्षक भुते, ज्ञानेश्वर बोरकर, श्रीकांत मेश्राम, मारबते यांना पुयार- इटखेडा मार्गावर नाकाबंदी करण्यास सांगीतले. यात पोलिसांना इटखेडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमएच ३९-१०९५ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे क्वालीस वाहन दिसून आले.

Caught liquor going to Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारू पकडली

गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारू पकडली

googlenewsNext
ठळक मुद्दे४.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त : इटखेडा मार्गावर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : पुयार मार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू घेऊन जात असलेले वाहन पोलिसांनी पकडले. ही कारवाई अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी बुधवारी (दि.१६) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत वाहन व दारू असा चार लाख १९ हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.
क्वालीस या वाहनातून पुयार मार्गे इटखेडा गावाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली. यावर पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी लगेच सहायक पोलीस निरीक्षक भुते, ज्ञानेश्वर बोरकर, श्रीकांत मेश्राम, मारबते यांना पुयार- इटखेडा मार्गावर नाकाबंदी करण्यास सांगीतले. यात पोलिसांना इटखेडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमएच ३९-१०९५ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे क्वालीस वाहन दिसून आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट कंपनीचे दारूने भरलेले ४८ बॉक्स सापडून आले. या दारूची किंमत एक लाख १९ हजार ६०० रुपये असल्याचे समजते.
पोलिसांनी तीन लाख रुपये किंमतीची क्वालीस व दारू असा एकूण चार लाख १९ हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला. तसेच आरोपी वाहनचालक सुदर्शन माणिक मेश्राम उदापुर ( ब्रम्हपुरी), गुणीराम पुंडलिक मांदाडे (रा,एकोडी, साकोली) यांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ), ७७ (अ), ८३, सहकलम १०९ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Caught liquor going to Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.