शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजल्या २८१ कळ्या

By admin | Updated: February 4, 2016 01:46 IST

जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही.

नरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही. कुपोषणाबरोबरच इतर कारणांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात गेल्या नऊ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ६६६ महिलांची प्रसूती झाली. यातील १३ हजार ६२६ महिलांची म्हणजेच ९९.७१ टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्यात आली, तर फक्त ४० महिलांची प्रसुती घरी झाली आहे. एकूण प्रसूतींपैकी ३ हजार ९२७ उपकेंद्रात, २ हजार २६२ प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ६ हजार ६६२ प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आल्या आहेत. ७७५ प्रसुती खासगी रूग्णालयात करण्यात आल्या. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिलांना आरोग्य संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह धरला. त्याचा परिणाम आज गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. यासाठी जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे महिलांची घरी प्रसुती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थांबविण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.२.२३ टक्के नवजात बालकांचा मृत्यूमागील नऊ महिन्यात ३०५ म्हणजेच २.२३ टक्के अर्भक दगावले आहेत. यात २४६ महिलांनी जुळ्या बालकांना जन्म दिला. डिसेंबर महिन्यात १ हजार ६६९ प्रसूती झाल्या. यातील १ हजार ६६६ प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आल्या. यात उपकेंद्र ४९०, प्राथमिक आरोग्य केंद्र २६७, बाई गंगाबाई महिला रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात ७५७ व खासगी रूग्णालयात १५७ खासगी रूग्णालयात प्रसूती करण्यात आली. ३ महिलांची प्रसूती घरी झाली. या महिन्यात ४१ नवजात बाळांचा जन्म झाला तर ११ जुळ््या बालकांनी जन्म घेतला.आठवडाभरात ३३.८० टक्के बालकांचा मृत्यू जिल्ह्यात ९ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला. यात १ ते ७ दिवसाच्या आत ९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. १ ते ६ वर्षातील ३६ बालकांचा तर ६४ बालकांचा जन्म घेतल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यू झाला. ७ ते २८ दिवसात ४१, एक महिना ते १ वर्षातील ४५ बालकांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात एक वर्षाच्या आत २७ बालकांचा मृत्यू झाला.रस्त्यातच तीन गर्भवतींचा मृत्यूआरोग्य विभागाने गर्भवतींना आरोग्य संस्थेत पाहेचविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली असली तरी गर्भवतींना योग्य वेळी आरोग्य संस्थेत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाची ही सेवा निष्फळ ठरत आहे. परिणामी नऊ महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. नऊ महिन्यात सहा मातांचा मृत्यू झाला आहे. या मृत गर्भवतींमध्ये ग्रामीण भागातील पाच तर शहरातील एका गर्भवतीचा समावेश आहे. एप्रिल, मे, जून व आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी तर आॅक्टोबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. दोन मातामृत्यू बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तर एक मातामृत्यू खासगी रूग्णालयात आहे.