शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक अवैध वाहतुकीच्या विळख्यात

By admin | Updated: November 30, 2014 23:09 IST

शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकार गर्दी दिसून येते.

गोंदिया : शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकार गर्दी दिसून येते. स्थानिक जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरही मोठी गर्दी असते. मात्र या बसस्थानकाला अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी विळखा घातला आहे.
बसस्थानकावरून नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आदी मार्गाच्या बसगाड्या धावत असतात. नागरिकांना स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठीदेखील एस.टी. बसचे आश्रय घ्यावे लागते. मात्र या बसस्थानकाभोवती काळी-पिवळी तसेच आॅटो चालकांनी विळखा घातल्याने जागेअभावी एसटी चालकांना आपले थांबे बदलावे लागत आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहे.
जयस्तंभ चौक तसेच इतर एसटीच्या थांब्यावर अवैध वाहनांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. प्रवासी जेथे बसगाड्या थांबतात तेथे बसची वाट पाहात उभे राहतात. मात्र या अवैध वाहनांच्या विळख्याने एसटी बसच्या चालकांची गोची होते व ते देखील बस थांबे सोडून आपले वाहन दुसऱ्या ठिकाणी थांबवतात.
थांब्यावर उभे असलेले प्रवासी धावत जावून गाडीत बसतात. या प्रकारामुळे दररोज छोटे मोठे अपघातही घडतात. हा सर्व प्रकार वाहतुक पोलीसांच्या डोळ्यासमोर होतो . त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांना एक प्रकारचे अभयच मिळत आहे. बसथांब्याच्या जागेवर काळी-पिवळी, आॅटोरिक्षा, सायकल रिक्षा तसेच फळांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अडवला जातो व तो अरूंद पडतो.
यामुळे एसटी चालकदेखील वाहन कुठे उभे करावे म्हणून संभ्रमात असतात. जेथे मोकळी जागा मिळेल तिथे आपली बस उभी करतात. बस मिळावी म्हणून बसच्या मागे काही प्रवासी व विद्यार्थी धावतात दरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वाहतूक पोलीस व एसटी विभागाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)