शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यातील पोलीस पाटील पदभरती रद्द करा

By admin | Updated: December 18, 2015 02:23 IST

तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी ४२ पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली.

गोंदिया : तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी ४२ पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र या पदभरतीला भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याचा आरोप करीत सदर पदभरती रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी पोलीस पाटील पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यासाठी एकूण ३२४ अर्ज प्राप्त केले. मात्र या अर्जांची छानणी न करताच ७ नोव्हेंबर २०१५ रोजी तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालय या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. परंतु परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. पेपर कसे सोडवावे याची माहितीसुद्धा देण्यात आली नाही. परीक्षा झाल्यावर दोन तासांनी निकाल देणे आवश्यक होते. परंतु उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी निकाल देण्यास चार ते पाच दिवस लावले. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले. उपविभागीय कार्यालयात १० नोव्हेंबर २०१५ रोजी पोलीस पाटील परीक्षेला निकाल लावण्यात आला. मात्र त्यातही पात्र परीक्षार्थ्यांचे केवळ बैठक क्रमांक देण्यात आले होते. कुणाला किती गुण मिळाले व त्यांची नावेसुद्धा जाहीर करण्यात आले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी नावांची यादी लावण्यात आली. मात्र गुण दर्शविण्यात आले नाही. तेथील कारकून टेंभुर्णे यांनी लेखी व तोंडी दोन्ही मिळून गुणांची यादी लावण्यात येईल, असे सांगितले होते.पोलीस पाटील भर्ती २०१५ अंतर्गत गृहविभागाच्या परिपत्रकानुसार (शासन निर्णय-बी.व्ही.पी. १११३/१७६७/प्रक्र५९२/दि.२२ आॅगस्ट २०१४) पोलीस पाटील पदासाठी दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा वस्तूनिष्ट व बहुपर्यायी स्वरूपाची राहील. त्यात सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा समावेश, असे स्वरूप आहे. पण गोंदिया जिल्ह्याचे केवळ पाच प्रश्न दिले, चालू घडामोडीवर केवळ दोन ते तीन व इतर सर्व प्रश्न गणित, इंग्रजी, मराठी व्याकरण व महाराष्ट्र स्तराचे होते. पोलीस पाटील पदासाठी इंग्रजी विषय नसतानाही त्यात चार प्रश्न इंग्रजीचे होते. (प्रतिनिधी)