शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोंडा दरवाढीमुळे वीट उद्योग संकटात

By admin | Updated: July 7, 2014 00:00 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विटा बनविण्याच्या व्यवसाय केला जातो. परंतु यावर्षी कोंड्याच्या दरवाढीमुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून वीट भट्टी ठेकेदारांनी कोंड्यासाठी आधीच पैसे मोजून

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विटा बनविण्याच्या व्यवसाय केला जातो. परंतु यावर्षी कोंड्याच्या दरवाढीमुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून वीट भट्टी ठेकेदारांनी कोंड्यासाठी आधीच पैसे मोजून दिल्यानंतरही वीटभट्टी व्यवसायासाठी कोंडा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.
वीट व्यवसायाला धानाची कापणी झाल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून सुरुवात केली जाते. तेव्हापासून जवळपास मे ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत हा व्यवसाय अतिशय तेजीत असतो. काही वर्षाअगोदर वीटभट्टीमध्ये लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. परंतु शासनाने वीटभट्टींवर लाकडांचा वापर करण्यावर बंदी घातल्यामुळे कोंड्याचा वापर वीटभट्टीत केला जातो. यामुळे कोंड्याचे भाव गगनाला भिडले आहेत. विटा व्यावसायिक चांगलेच हैराण झाले आहेत.
या व्यवसायाला हिवाळ्यात सुगीचे दिवस येतात. परंतु जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हा व्यवसाय सुरू असूनही यावर्षी कोंड्याचा तुटवड्यामुळे वीटभट्टी ठेकेदार अडचणीत आले आहेत. हा व्यवसाय साधारणत: नदी, नाले यांच्या काठाशीच चालत असल्याचे दिसून येते. कारण या व्यवसायासाठी कोंडा व पाण्याची तेवढीच आवश्यकता असते. यामुळे जोमाने हा व्यवसाय नदी नाल्यांच्या काठाशी सुरू असल्याचे चित्र दृष्टीस पडते. कोंडा हा वीटभट्टीकरिता आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कोंड्याच्या प्रत्येक गाडीमागे १० हजार रुपये ठेकेदारांना मोजावे लागत आहेत. दरम्यान काही ठेकेदारांनी कोंड्यासाठी तरध आधीच बुकिंग केले असल्याचेही चर्चा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन केले जाते. यामुळे राईस मिल संख्या ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन केले जाते. यामुळे राईस मिल संख्या ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अल्पशा पावसाने यावर्षी धान उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. पर्यायाने धान उत्पादन कमी झाल्याने याचा फटका सर्व राईस मिलांना बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात धानाची मिलिंग केली जात नसल्याने कोंडा मिलमध्ये मुबलक प्रमाणात मिळत नाही. यामुळेच कोंड्याचे भाव वाढलेले आहेत. (शहर प्रतिनिधी)