शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अभियंता जाळ्यात

By admin | Updated: June 11, 2014 23:17 IST

रस्ता बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांसह टीव्ही व गॅस कनेक्शन मागणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने

पैशासह गॅसची मागणी : घरझडती व बँकेत ९७ लाख
गोंदिया : रस्ता बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांसह टीव्ही व गॅस कनेक्शन मागणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. येथील लोहिया वॉर्ड परिसरातील अभियंता दीपक पऱ्हाटे याच्या घरी बुधवारी (दि.११) सकाळी ९.४० वाजता ही कारवाई करण्यात आली.
यानंतर सदर पथकाला अभियंत्याच्या चंद्रपूर येथील घरातून रोख तसेच गोंदिया व चंद्रपूर येथील बँक खात्यात ९६ लाख ८८ हजार ६७० रूपयांची रक्कम मिळून आली आहे.
सविस्तर असे की, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत धापेवाडा- अत्री-बोदा-सेजगाव या रस्त्याच्या खडीकरणाचे चार लाख रूपयांचे कंत्राट कोसमतर्रा (सालेकसा) येथील ओम शांती मजूर सहकारी संस्थेला मंजूर केले होते. संस्थेने हे काम पूर्ण करण्यासाठी एका कंत्राटदारास दिले व स्वत:चे पैसे लाऊन हे काम केले. या कामाचा एक लाख ३३ हजार रूपयांचा पहिला धनादेश कंत्राटदाराला मिळाला आहे. मात्र उर्वरीत बिल मंजूर करून देण्यासाठी अभियंता दीपक पऱ्हाटे यांनी कंत्राटदारास निघालेल्या बिलाचा मोबदला व उर्वरीत बिलाचे असे मिळून एक लाख रूपयांची मागणी केली. या प्रकरणाला घेऊन कंत्राटदार व अभियंता पऱ्हाटे यांच्यात मागील सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. अखेर कंत्राटदाराने २९ मे रोजी लाचलुचपत प्रतीबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली.
त्यानंतर ३ जून रोजी ५० हजार रूपये रोख, १८ हजार रूपये किमतीचा एक टिव्ही व सात हजार रूपये किमतीचे गॅस कनेक्शन देण्याबाबत दोघांत बोलणी झाली. ठरल्यानुसार कंत्राटदार ११ जून रोजी सकाळी ९.४० वाजतादरम्यान अभियंता पऱ्हाटे यांच्या लोहिया वॉर्ड येथील निवासस्थानी रोख ५० हजार रूपये व गॅस कनेक्शन (सिलेंडर, शेगडी व कागदपत्र) घेऊन गेला. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने अभियंता पऱ्हाटे यास गॅस कनेक्शन घेत असताना रंगेहाथ पकडले.
विशेष म्हणजे येथील पथकाने दिलेल्या माहितीवरून, चंद्रपूरच्या एसीबी पथकाने देखील पऱ्हाटेंच्या रामनगर मधील विदर्भ हाऊसींग सोसायटीतील घरावर धाड घातली. या धाडीत पथकाला घरझडतीत ६६ लाख ९५ हजार रूपये रोख मिळून आले. पऱ्हाटे यांच्या स्टेट बँकेच्या गोंदिया शाखेतील खात्यात १४ लाख ५७ हजार २९२ रूपये तसेच चंद्रपूर येथील खात्यात १५ लाख ३६ हजार ३७८ रूपये मिळून आले असून खाते सील करण्यात आले आहे.
पथकाने पऱ्हाटे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अधिकची संपत्ती मिळण्याची शक्यता असल्याने झडती सुरू असल्याची माहिती एसीबीचे उपअधीक्षक दीनकर ठोसरे यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, हवालदार गोपाल गिऱ्हेपुंजे, ब्रिजकिशोर तिवारी, शिपाई राजेश शेंदे्र, दीपक दत्ता व पथकाने यशस्वी केली. (शहर प्रतिनिधी)