शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही आगारांना १७ लाखांचा फटका

By admin | Updated: December 19, 2015 01:45 IST

वेतनवाढीच्या मागणीला घेवून अनिश्चितकाळासाठी आंदोलनात उतरलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला.

डोकेदुखी दूर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलागोंदिया : वेतनवाढीच्या मागणीला घेवून अनिश्चितकाळासाठी आंदोलनात उतरलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला. त्यामुळे तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला व त्वरित कामाला सुरूवातही केली.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांना घेवून १६ डिसेंबरपासून आंदोलन सुरू केले होते. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) वतीने कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीला घेवून सदर आंदोलन सुरू करण्यात आले होते. गोंदिया आगारात या संघटनेचे बोटावर मोजन्याएवढे कर्मचारी आहेत. त्यामुळे गोंदियात या संघटनेच्या आंदोलनाचा काही विशेष जोर दिसून आला नाही. परंतु बाहेर गेलेल्या बसेस तिथेच अडून राहिल्या. आता आंदोलन समाप्त होताच त्या बसेस आता परतण्यासाठी स्वतंत्र झाल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराचे व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्यानुसार संपूर्ण दिवसभरात जवळपास ४०० फेऱ्या होवू शकल्या नाही. तसेच एवढ्याच फेऱ्या गोंदिया बस स्थानकावर पोहचू शकल्या नाही. संप संपताच सायंकाळच्या वेळी विविध ठिकाणांसाठी बसेस सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. गोंदिया आगाराचे दोन्ही दिवसात जवळपास १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.तिरोडा आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलन संपल्याची माहिती मिळताच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार फटाकेबाजी करून आनंद व्यक्त केला. संप संपल्यावर सर्व कर्मचारी आपल्या कामावर परत गेले व १८ डिसेंबरच्या सायंकाळी तिरोडा आगारातून हाल्टिंग बसेस आपल्या गंतव्य स्थळाकडे रवाना झाले. तिरोडा आगाराची अकोला बस नागपूर, चंद्रपूर व वर्धासाठी निघालेल्या बसेस त्याच ठिकाणी अडून होत्या. या बसेस तिरोड्याकडे परतण्यासाठी निघालेल्या आहेत. या आंदोलनामुळे तिरोडा आगाराला जवळपास सात लाख रूपयांचा नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)