शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नोंदणी अर्जावर बोगस सही, शिक्क्यांच्या वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगार नोंदणी केली जात आहे. यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामीण तर शहरासाठी नगर परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी नगर परिषदेत काही व्यक्ती कामगारांना अर्ज भरून देण्याचे काम करीत आहेत.

ठळक मुद्देनगर परिषदेत जोरदार चर्चा : प्रकरणाच्या चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा यासाठी कामगार नोंदणी केली जात आहे. यांतर्गत नगर परिषदेत शहरी भागातील कामगारांचे अर्ज स्वीकार केले जात आहेत. यात मात्र बोगस सही व शिक्क्यांचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासन अद्याप गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगार नोंदणी केली जात आहे. यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामीण तर शहरासाठी नगर परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी नगर परिषदेत काही व्यक्ती कामगारांना अर्ज भरून देण्याचे काम करीत आहेत.या अर्जात कंत्राटदाराचा शिक्का व त्यांची सही असलेला अर्ज नगर परिषदेतील बांधकाम विभागातील एका अभियंत्यांकडे द्यायचा आहे. मात्र काही अर्जांवर नगर परिषद कनिष्ठ अभियंत्यांचा शिक्का व त्यावर बोगस सही मारण्यात आल्याचे नगर परिषद अभियंत्यांच्या लक्षात आल्याची माहिती आहे. यातूनच अर्जावर संबंधित व्यक्ती परस्पर बोगस सही व शिक्के मारून अर्ज पाठवित असल्याचा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होत असून याबाबत नगर परिषदेत चर्चा सुरू आहे. संबंधित अभियंत्यांकडून एक-दोनच असे अर्ज निदर्शनास आल्याचे बोलले जात आहे.मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास आणखीही अर्ज मिळतील असे नगर परिषदेतच बोलले जात आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासन मात्र गप्प बसून आहे.अर्जासाठी घेतले जातात पैसेयोजनांचा लाभ मिळणार या आशेने कामगार नोंदणीसाठी नगर परिषद कार्यालयात गर्दी करीत आहेत. नेमका याचाच फायदा घेत काही व्यक्तींकडून या गरीब कामगारांकडून पैसे उकळले जात असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेत याबाबत उघड चर्चा सुरू आहे. याची सखोल चौकशी केल्यास काहीतरी नक्कीच हाती येणार किंवा गरीब कामगारांची होत असलेली लूट थांबेल.या प्रकाराबाबत माहिती नाही.मात्र प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाईल.- चंदन पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार