शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी भटकतोय अंध लखन

By admin | Updated: April 24, 2017 00:31 IST

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लखन कोरे मागील एक ते दीड वर्षापासून नोकरीच्या शोधात भटकंत आहे.

पालकमंत्र्यांचे निर्देशही डावलले : आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून टाळाटाळसाखरीटोला : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लखन कोरे मागील एक ते दीड वर्षापासून नोकरीच्या शोधात भटकंत आहे. मात्र लखनच्या आयुष्यात अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. नोकरीच्या रुपाने प्रकाश किरणांची आस लावून बसलेल्या लखनला लोकप्रतिनिधीपासून ते अधिकारी वर्गापर्यंत केवळ पोकळ आश्वासने मिळाली. त्यामुळे आयुष्य कसे जगावे? असा प्रश्न लखनपुढे निर्माण झाला आहे. नोकरी नसल्याने त्याच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र अधिकाऱ्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही.साखरीटोल्यापासून ३ कि.मी. अंतरावरील कन्हारटोला ता. आमगाव येथील लखन सुखदेव कोरे हा बॅरी.राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला तरुण. दोन्ही डोळ्याची अंध आहे. आई-वडीलांना लखन एकटाच मुलगा. आई नेहमी आजारी असते. शेती मोजकीच असल्यामुळे घरात अठराविश्व दारिद्र्य आहे. आईला ब्लडकॅन्सर असल्याने उपचार करु शकत नाही. काही महिन्यापूर्वी पुणे येथील टेक्नीकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संख्येत आॅपरेटरची ट्रेनिंग केली. त्यानंतर त्यावेळचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रयत्नाने देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात टेलीफोन आॅपरेटर म्हणून ५००० रुपयांची नोकरी मिळवून दिली. त्यासाठी लखन रोज ५० कि.मी. अपडाऊन करायचा. सदर नोकरीत लखनचे घर कसेबसे चालत होते. मात्र काही महिन्यानंतर लखनला नोकरीतून काढण्यात आले.नोकरी गेल्यानंतर अंध लखनची नोकरीसाठी फरकट सुरू झाली. त्यासाठी तो सध्याचे जिल्हाधिकारी यांना भेटला. क्षेत्राचे आ.संजय पुराम यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली. मात्र आश्वासना पलिकडे काहीही मिळाले नाही. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना भेटला. पालकमंत्र्यानी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लखनला नोकरी देण्याचे निर्देश दिले. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्देशालाही दाद दिली नाही. प्रकल्प अधिकारी देवरी यांनी लखनला नोकरी देण्याचे सौजन्य दाखविले नाही. १५ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रानुसार लखनला एकात्मिक आदिवासी प्रकल्प देवरी येथे रुजू करुन घेणे आवश्यक असताना लखनला आजपर्यंत नोकरीसाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. १ एप्रिलपर्यंत नोकरीवर रुजू करुन घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिना संपण्याच्या मार्गावर आला असूनही घेतले नाही.