शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भरतची आत्महत्या नसून हत्याच, गावकऱ्यांचा संशय

By admin | Updated: November 4, 2014 22:42 IST

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुरदाडा येथील भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह सोमवारी (दि.३) लोधीटोला शिवारातील ११ के.व्ही. विद्युत खांबाला दोराने बांधलेल्या

परसवाडा : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुरदाडा येथील भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह सोमवारी (दि.३) लोधीटोला शिवारातील ११ के.व्ही. विद्युत खांबाला दोराने बांधलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांची हत्याच करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. त्यामुळे परिसरात बुधवारी तणावपूर्ण वातावरण होते. मृत भरत बसोने हे गावोगावी जाऊन हातठेल्यावर रेडीमेड कपडे विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यामुळे भरतची परिसरात सर्वत्र ओळख होती. घटनास्थळ आणि त्यांच्या घराचे अंतर साडेतीन किमी असून भरत त्या ठिकाणी गेला कसा असा संशय गावकरी व्यक्त करीत आहेत. दि. २ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता भरत घरी होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत तो मुरदाडा बाजार चौकात लोकांना दिसला. रात्री भरत घरी पोहोचलाच नाही व घरच्यांनीही भरतचा शोध घेतला नाही. सकाळी आजुबाजुच्या मोहल्ल्यातील महिलांनी मृतकाच्या पत्नीला विचारले असता तिने माझ्या भावाला माहिती आहे असे सांगितले. मृत भरत मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. त्याची पहिली पत्नी मुरदाडा येथील असल्याने तो सासरीच १५ वर्षापासून वास्तव्य करून राहात होता. पहिल्या पत्नीपासून एक विशाल नावाचा मुलगा आहे. १० वर्षानंतर पहिली पत्नी मरण पावल्याने दुसरे लग्न केले. कारंजा येथील गिरजासोबत लग्न झाले. गिरजाचेही हे दुसरे लग्न आहे. गिरजाशी मात्र त्याचे नेहमी भांडण होत असे. गावातील भरतच्या वाट्याची अडीच एकर जमीन विक्री करून पैसे आण यासाठी तिचे भांडण होत असे. भरतच्या हत्येमागे घरातील भांडण हेच कारण असावे अशी शंका गावकऱ्यांना येत आहे. भरतने आत्महत्या केलाचा देखावा करण्यात आला, मात्र ही हत्याच असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. भरतचे भाऊ मुलसिंह बसोने यांनीही भरत फोनवर बोलत होता तेव्हा पत्नी जमीन विक्री करण्यासाठी भांडण करीत असल्याचे सांगत असल्याचे सांगितले. मोहल्ल्यातील १० वर्षे वयाच्या तीन मुलांनी गिरजाच्या भावाने सकाळी १० वाजता येऊन घरून पैसे नेल्याचे सांगितले. चिठ्ठीही आढळली, पण त्यात काही लिहीले आहे हे कळल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाही अशी भूमिका गावातील नागरिक व पहिल्या पत्नीच्या भावाने घेतली होती. त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती होती. मोहल्ल्यातील काही नागरिक व महिलांनीही बयान दिले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पो.उपनिरीक्षक सावंत करीत आहे. सत्य समोर येईलच असे सावंत यांनी सांगितले. सोबत गंगाझरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील हे ही तपास करीत आहे. घरातील मोबाईलही जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यातील खऱ्या आरोपींना दोन दिवसात गजाआड करणार असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)