शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! मलेरिया, डेंग्यू पसरतोय पाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातसुद्धा मागील आठवडाभरापासून मलेरिया आणि डेंग्यूची साथ सुरू असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत मलेरियाच्या ३६७, तर डेंग्यूच्या १२१ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दोन्ही आजाराच्या प्रत्येकी एका रुग्णाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदल आणि डासांचा प्रादुर्भावामुळे या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होत उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातसुद्धा मागील आठवडाभरापासून मलेरिया आणि डेंग्यूची साथ सुरू असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या भागात शिबिर लावून नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच आशा आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या परिसरात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. तसेच डासनाशक फवारणीसुद्धा सुरू केली आहे. छोटा गोंदिया येथील एका रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. 

ही आहेत मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे-  खूप थंडी वाजून ताप येणे-  उलटी होणे, मळमळ वाटणे-  तर डेंग्यूमध्ये, डोळे व डोके दुखणे,-  कंबर दुखणे, गरगरल्या सारखे होणे

अंगावर ताप काढू नका - वातावरणातील बदलामुळे वायरल फीवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तर काही भागात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप राहिल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करून उपचार घ्या. कुठलाही ताप अंगावर काढू नका.

..ही घ्या काळजी - आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा- आठवड्यातून एक दिवस कोरोडा दिवस पाळा- नियमित मच्छरदाणीचा वापर करा- आपण वास्तव्य करीत असलेल्या परिसरात पाणी साचू देऊ नका - तीन-चार दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असल्यास त्वरित जवळच्या डाॅक्टरांशी संपर्क साधा.

मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य शिबिर तसेच आशासेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तसेच डासनाशक फवारणीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. - डॉ. वेदप्रकाश चौरागडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :dengueडेंग्यू