शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
2
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
3
...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक
4
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
5
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
6
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
7
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
8
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
9
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
10
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
11
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
12
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
13
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
15
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
16
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
17
IND vs PAK मॅचबद्दल प्रश्न विचारला; सुरक्षा रक्षक संतापला, YouTuber ची गोळ्या झाडून हत्या
18
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 
19
"उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज..."; उदय कोटक यांनी सांगितली आठवण
20
Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार

५ हजार दीनदुबळ्यांना हक्काचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 5:00 AM

गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरापासून ते तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दीनदुबळ्या लोकांच्या घरी भेट देऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो किंवा नाही याची पाहणी केली. हे काम सतत सुरूच आहे. ज्या गावात तहसीलदार किंवा इतर अधिकारी पोहोचले तर कोणत्या गरिबाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही याची चौकशी केली.

ठळक मुद्दे‘गृहभेट आपुलकीची’ उपक्रम : जिल्हाधिकारी खवलेंच्या संकल्पनेतून सावरताहेत निराधार

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या निराधारांसाठी असलेल्या योजनांपासून कोसो दूर असलेल्या निराधार, विधवा, दिव्यांग व वृद्धांना त्या   योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ‘गृहभेट आपुलकीची’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ हजार निराधारांना निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.   गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरापासून ते तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दीनदुबळ्या लोकांच्या घरी भेट देऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो किंवा नाही याची पाहणी केली. हे काम सतत सुरूच आहे. ज्या गावात तहसीलदार किंवा इतर अधिकारी पोहोचले तर कोणत्या गरिबाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही याची चौकशी केली. त्या चौकशीत जे गरजू शासकीय योजनांपासून वंचित होते त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्वरित लाभार्थ्यांच्या घरातूनच ऑनलाईन अर्ज करून त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण केली. जिल्ह्यातील ५ हजार नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. ग्रामीण भागातील अनेकांना अर्ज कसे करावे, काय कागदपत्र जोडावे याची कल्पना नसल्याने त्याचा गैरफायदा समाजातील काही दलाल घेत होते. या दलालांकडून गोरगरिबांचे आर्थिक शोषण होत होते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी खवले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील निराधारांसाठी  ‘गृहभेट आपुलकीची’ हा उपक्रम फायद्याचा ठरत आहे.  

अर्जुनी-मोर. आघाडीवर तर सडक-अर्जुनी तालुका पिछाडीवरजिल्ह्यातील किंवा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी गावात गेले तर त्यांना अशा गरजूंना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत निराधार असलेल्या ५ हजार लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याने १२२८ लाभार्थी शोधून सर्वाधिक लाभ देणारा पहिला तालुका आहे. तर सडक-अर्जुनी २५५ लोकांना लाभ देऊन जिल्ह्यात सर्वात मागे आहे. गोंदिया शहरातील ६६१, गोंदिया ग्रामीण भागातील ५३२, तिरोडा ४८१, गोरेगाव ३४५, सालेकसा ३०८, आमगाव तालुका ३०३, देवरी तालुक्यातील ८६६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

कार्यालयाची पायरी न गाठता योजनेचा लाभग्रामीण भागातील अनेक लोक संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेपासून वंचित आहेत. अनेकांना या लाभासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसे करावे याची माहिती नसते. हे अर्ज करणे त्यांच्या समोर मोठे आव्हान होते.  अनेक गरजू लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी तहसील कार्यालयाची पायरी चढून चपला झिजविल्या. परंतु आता तहसील कार्यालयाची पायरीही न चढताच या योजनांचा लाभ त्यांना प्रशासन त्यांच्याच दारी जाऊन देत आहे.  

दीनदुबळ्यांना  त्यांच्या हक्काची शासन योजना मिळावी या हेतूने ‘गृहभेट आपुलकीची’ उपक्रम सुरू करण्यात आला. गरजूंना योजनेचा लाभ कसे घेतात हे देखील माहिती नव्हते. त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी  हा उपक्रम राबवून आतापर्यंत ५ हजार निराधारांना लाभ  देण्यात आला आहे. पुढेही लाभ देणे सुरूच राहील.-राजेश खवले, जिल्हाधिकारी गोंदिया.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी