शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमधील आर्थिक व्यवहार ठप्प

By admin | Updated: October 24, 2015 01:46 IST

गुरूवारच्या दसऱ्यानंतर शनिवार व रविवार असे तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत,...

तीन दिवस सुट्या : एटीएम सुविधा ठरतेय महत्त्वाची गोंदिया : गुरूवारच्या दसऱ्यानंतर शनिवार व रविवार असे तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व क्षेत्रीय बँकांच्या १२९ शाखांमधील आर्थिक व्यवहार ठप्प पडणार आहेत. या तीन दिवसात कोट्यवधींचे क्लिअरींग अडणार असले तरी सुट्यांचा आर्थिक व्यवहारांवर फारसा प्रभाव पडणार नसल्याचे अधिकृत सुत्रांचे म्हणणे आहे. आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिना प्रामुख्याने सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात सुट्या येतात. कधी-कधी सलग सुट्या येत असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची लॉटरीच लागते. यंदाही तशाच सुट्या आल्या आहेत, मात्र गुरूवारच्या (दि.२२) सुटीनंतर शुक्रवारी (दि.२३) बँका सुरू असल्यामुळे गुरूवारी थांबलेले व्यवहार शुक्रवारी झाले. मात्र शनिवार (दि.२४) आणि रविवारची (दि.२५) शासकीय सुटी व्यापाऱ्यांसह अनेकांना त्रासदायक ठरणार आहे.जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व्यापारी व क्षेत्रीय बँकांच्या शहर व ग्रामीण भागात १२९ शाखा आहेत. सण-उत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. त्यात या सुट्यांचा नक्कीच अर्थचक्रावर परिणाम होणार आहे. मात्र हा परिणाम नगण्य राहणार असल्याचे अग्रणी जिल्हा प्रबंधकांनी सांगितले. विशेष म्हणजे बाजारातील ‘स्लॅक’ यापूर्वी कधीच दिसून आला नसल्याचे बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक रिंगणगावकर यांनी सांगितले. त्यामुळे या सुट्यांचा जास्त प्रमाणात परिणाम जाणवणार नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)