शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाची ‘बरसो रे मेघा’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यांवर सुध्दा पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच बळीराजा बरसो रे मेघा मेघाची हाक देत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी दुबार पेरणीच्या संकटात वाढ : पेरण्या पुन्हा खोळंबल्या, यंदा १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाचे

नियोजनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहे. तर काही शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यांवर सुध्दा पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच बळीराजा बरसो रे मेघा मेघाची हाक देत असल्याचे चित्र आहे.मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर आणि एक दोनदा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. मात्र यंदा मृगाच्या सरी दमदार बसरल्या नाही. तर जवळपास २० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या पडल्या आहेत.जून महिन्यात एक दोनदा जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी वेळेत पेरणीची कामे पूर्ण केली आहे. मात्र बºयाच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री न करता आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. तर आता वरुण राजाने देखील त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एकूण १४ हजार हेक्टरवर पऱ्हे टाकून पूर्ण झाले आहे.तर अजून बऱ्याच प्रमाणात पेरणी होणे शिल्लक आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ नाकारता येत नाही. त्यामुळे बळीराजासह जिल्ह्यावासीयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पाऊस लांबल्याने तूट वाढलीजिल्ह्यात यंदा मृगाच्या सरी दमदार बरसल्या नाही तर त्यानंतरचे पावसाचे नक्षत्र सुध्दा कोरेड गेले. पाऊस लांबत असलेल्या पावसाची तूट सुध्दा वाढत आहे. जिल्ह्यात २८ जूनपर्यंत सरासरी १५०.७६ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी १३२७ मिमी पाऊस पडतो. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाची तूट वाढत चालल्याने पाऊस यंदा सरासरी गाठणार की नाही अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित आहे.नदी नाल्यांना ही पावसाची प्रतीक्षारविवारी जिल्ह्यात ७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली. यात गोंदिया शहरातील कुंभारेनगर,फत्तेपूर, डोंगरगाव, या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता एकूण १५ कंटेन्मेंट झोन आहेत.जिल्ह्यात अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रीय झालेला नाही. हवामान विभागाने सुध्दा येत्या सात आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. पेरणी आणि पºह्यांसाठी पाऊस गरजेचा आहे. आठ दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :agricultureशेती