शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२४२ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात झाली आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तर तिरोडा तालुक्यात विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआणखी तीन कोरोना बाधितांची भर : एक कोरोना बाधित कोरोनामुक्त, अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६० वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असून रविवारी (दि.५) आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांचा आकडा ६० वर पोहचला आहे. तर एक कोरोना बाधित कोरोनामुक्त झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या २४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात झाली आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तर तिरोडा तालुक्यात विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.रविवारी आढळलेल्या तीन कोरोना बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील दोन आणि तिरोडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता सुध्दा वाढत चालली आहे.गोंदिया येथील कुंभारेनगर येथील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १३ वर पोहचला आहे. त्यामुळे हा परिसर कोरोनाचे हॉट स्पॉट होत असल्याचे चित्र आहे. हीच बाब लक्षात घेत स्थानिक नगर परिषद आणि आरोग्य विभागाने कुंभारेनगर परिसरात शनिवारपासून आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात रविवारी तीन नवीन कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६० वर पोहचला आहे. तर मुंबईहून आलेला एक कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६७ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १०५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.३८९९ नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४०६६ स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १६७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ३८९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर २४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात आता १३ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून कोरोना बाधित आढळलेल्या परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला जात आहे. जिल्ह्यात आता १३ कंटेन्मेंट झोन असून या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास स्थानिक प्रशासनाने सुरूवात केली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या