२४२ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:54+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात झाली आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तर तिरोडा तालुक्यात विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.

Awaiting report of 242 swab samples | २४२ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

२४२ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देआणखी तीन कोरोना बाधितांची भर : एक कोरोना बाधित कोरोनामुक्त, अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६० वर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असून रविवारी (दि.५) आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांचा आकडा ६० वर पोहचला आहे. तर एक कोरोना बाधित कोरोनामुक्त झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या २४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात झाली आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तर तिरोडा तालुक्यात विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.
रविवारी आढळलेल्या तीन कोरोना बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील दोन आणि तिरोडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता सुध्दा वाढत चालली आहे.
गोंदिया येथील कुंभारेनगर येथील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १३ वर पोहचला आहे. त्यामुळे हा परिसर कोरोनाचे हॉट स्पॉट होत असल्याचे चित्र आहे. हीच बाब लक्षात घेत स्थानिक नगर परिषद आणि आरोग्य विभागाने कुंभारेनगर परिसरात शनिवारपासून आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात रविवारी तीन नवीन कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६० वर पोहचला आहे. तर मुंबईहून आलेला एक कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६७ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १०५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

३८९९ नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४०६६ स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १६७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ३८९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर २४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

जिल्ह्यात आता १३ कंटेन्मेंट झोन
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून कोरोना बाधित आढळलेल्या परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला जात आहे. जिल्ह्यात आता १३ कंटेन्मेंट झोन असून या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास स्थानिक प्रशासनाने सुरूवात केली आहे.

Web Title: Awaiting report of 242 swab samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.