शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

२९९ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

जिल्हयात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे सर्वांनाच धडकी रली होती. परिणामी शेतीची कामेही लांबल्या गेली. सुरूवातीचे २ महिने दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्हावासीयांना खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यात बरसलेल्या पावसाने सन २००५ मधील पुरालाही मागे टाकले होते.

ठळक मुद्देपुरानंतरही पावसाची तूट कायम । ३ तालुक्यांवर वरूणदेव प्रसन्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २००५ मध्ये आलेल्या पुराला मागे सोडणाऱ्या पुराने यंदा जिल्ह्यात कहर केला. असे असतानाही मात्र शासकीय आकडेवारीनुसार अपेक्षेच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असून तूट कायम आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत पावसाची नोंद घेतली असून त्यानुसार, ४३८०७.४६ मीमी म्हणजेच सरासरी १३२७.४९ एवढा पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे आता उरलेल्या १० दिवसांत आणखी १००८८.४९ मीमी म्हणजेच सरासरी २९९.७ एवढा पाऊस अपेक्षित आहे. अन्यथा यंदाही जिल्ह्यात पावसाची तूट कायम राहणार.जिल्हयात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे सर्वांनाच धडकी रली होती. परिणामी शेतीची कामेही लांबल्या गेली. सुरूवातीचे २ महिने दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्हावासीयांना खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यात बरसलेल्या पावसाने सन २००५ मधील पुरालाही मागे टाकले होते.ऑगस्ट महिन्यातील पावसाने चांगलाच कहर केला होता. असे असतानाही जिल्ह्यात शुक्रवारपर्यंतची (दि.१८) शासकीय आकडेवारी बघता ३३७१८.९७ मीमी पाऊस बरसला असून त्याची १०२१.७९ एवढी सरासरी आहे. तर जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत पाऊस नोंद केला जात असून शासकीय आकडेवारीनुसार ४३८०७.४६ मीमी पाऊस अपेक्षित असून त्याची १३२७.४९ एवढी सरासरी आहे.म्हणजेच, जिल्ह्यात आता उरलेल्या १० दिवसांत आणखी १००८८.४९ मीमी. पाऊस अपेक्षित असून त्याची २९९.७ एवढी सरासरी आहे. एकंदर जिल्ह्यात पूर येत पर्यंत पाऊस बरसला असतानाही सुरूवातीपासून पाऊस न बरसल्याने पडलेली तूट या पुरात बरसलेल्या पावसामुळेही भरून निघाली नसल्याचे दिसते.यामुळेच अद्याप २९९.७ एवढ्या सरासरी पावसाची तूट कायम आहे. आता १० दिवसांत पाऊस आल्यास व एवढी तूट भरून निघाल्यास शासकीय आकडेवारीनुसार पाऊस तंतोतंत पडल्याचे म्हणता येईल.गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुका लबालबजिल्ह्यात पावसाची तूट कायम असतानाच मात्र गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यावर मात्र पाऊस मेहरबान दिसत आहे. या तालुक्यांची आकडेवारी बघितल्यास शुक्रवारपर्यंत गोरेगाव तालुक्यात ३९८९.४६ मिमी (१३२९.८२) पाऊस अपेक्षित असताना ४६२६.२५ मिमी. (१३४२.६८) पाऊस बरसला आहे. तर सडक-अर्जुनी तालुक्यात ३९१३.३२ मिमी (१३०४.४४) पाऊस अपेक्षित असताना ४०८४.५८ (१३६१.५३) एवढा पाऊस बरसला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर