कवलेवाडाप्रकरणी अर्जुनी/मोरगाव बंद

By Admin | Updated: May 27, 2014 23:47 IST2014-05-27T23:47:35+5:302014-05-27T23:47:35+5:30

कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांच्या जळून मृत्यूप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पत्नी देवकाबाई खोब्रागडे यांची निर्दोष सुटका व्हावी यासाठी समता सैनिक दलाच्या

Arvuni / Morgaon shutdown in Kawalavad | कवलेवाडाप्रकरणी अर्जुनी/मोरगाव बंद

कवलेवाडाप्रकरणी अर्जुनी/मोरगाव बंद

अर्जुनी/मोरगाव : कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांच्या जळून मृत्यूप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पत्नी देवकाबाई खोब्रागडे यांची निर्दोष सुटका व्हावी यासाठी समता सैनिक दलाच्या वतीने अर्जुनी/मोरगावात मंगळवारी बंद पाळण्यात आला. प्रकरणाच्या निषेधार्थ शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शांती मोर्चा शायना कॉम्पलेक्स येथील समता सैनिक दलाच्या कार्यालयातून निघून गावातील प्रमुख मार्गाने बँड पथकासह संचलन करीत तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष बोधानंद गुरूजी, रत्नदीप दहिवले, प्रा. गजेंद्र गजभिये, दिलवर रामटेके, डॉ. अजय अंबादे, हिरकचंद टेंभुर्णे, के.एम.भैसारे आदीन्ंी केले.

मोर्चाचे सभेत रुपांतर होऊन तहसील कार्यालयात मार्गदर्शन केले. सहा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच सीबीआय चौकशीची मागणी करित संजयची पत्नी देवकाबाई हिची निर्दोष सुटका व्हावी, गंगाझरीचे पोलीस निरीक्षक पाटील यांचे निलंबन आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार के.झेड. दडमल, कटकमवार, पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Arvuni / Morgaon shutdown in Kawalavad