शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गंगाबाईतील बालकांना मिळणार कृत्रिम श्वास

By admin | Updated: January 5, 2016 02:14 IST

नवजात बालकांसाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात अतिदक्षता कक्ष आहे. या ठिकाणी बालकांवर उपचार केला जातो. परंतु

नरेश रहिले ल्ल गोंदियानवजात बालकांसाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात अतिदक्षता कक्ष आहे. या ठिकाणी बालकांवर उपचार केला जातो. परंतु अतिगंभीर असलेल्या बालकांना व्हेंटीलेटरवर ठेवण्याची वेळ आल्यास नागपूरला पाठवावे लागत होते. यातच अनेक बालकांना जीव गमवावा लागत होता. परंतू जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे आता या अतिगंभीर बालकांना गंगाबाई रुग्णालयातच व्हेंटीलेटरद्वारे कृत्रिम श्वासोच्छवासाची सोय केली जात आहे.बालकांसाठी असणाऱ्या व्हेंटीलेटरची सोय विदर्भात कोणत्याही जिल्हास्तरावरील रुग्णालयात नाही. जन्माला आलेले नवजात बालक अपरिपक्व नसेल किंवा त्याच्यावर उपचाराची गरज असेल तर त्याला अतिदक्षता कक्षात ठेवून उपचार केला जातो. परंतु अनेक वेळा बालकांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची गरज असते. अशा बालकांना व्हेंटीलेटरवर ठेवल्यास ते बाळ कदाचित वाचू शकते. आतापर्यंत अशा बालकांना नागपूरला रेफर केले जात होते. गंगाबाईत आलेले रूग्ण हे गरिब असतात. त्या बालकांचे पालक नागपूरला बाळाला उपचारासाठी नेण्याचा खर्च झेपत नाही म्हणून डॉक्टरांना विनवणी करीत होते. अश्या पालकांना एक आशेचा किरण मिळणार आहे. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्ट्या संवेदनशिल आहे. आता गंगाबाईत कृत्रिम श्वासोच्छवासाची सोय करण्यात येणार असल्याने बालमृत्यूूचे प्रमाणही घटणार आहे.बालरोगतज्ज्ञ मिळाले४बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात वर्षभरात सात हजार महिलांची प्रसूती केली जाते. जन्माला आलेले बहुतांश बालक कमजोर असतात. काही कुपोषित असतात तर काहींना विविध प्रकारचे आजार असतात. त्या बाळांची काळजी घेण्यासाठी गंगाबाईत डॉ.संजीव दोडके व डॉ. अमरीश मोहबे हे दोनच बालरोगतज्ज्ञ होते. परंतु आता डॉ.मयुरी ठाकूर व डॉ.सागर सानारे हे दोन डॉक्टर रूजू झाले आहेत. आणखी दोन डॉक्टर येणार असल्याची माहिती अधिक्षक डॉ.दोडके यांनी दिली. विकास कामांसाठी ५० लाखांची तरतूद४बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील किरकोळ कामे करण्यासाठी ३८ लाख तर नवजात बालकांच्या व्हेंटीलेटरसाठी १२ लाख रूपये जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून दिले. ही रक्कम लवकरच गंगाबाई स्त्री रूग्णालयाला मिळणार आहे.