शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने बळीराजाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार पावसाची वाट बघत होते.

ठळक मुद्देतलाव बोड्यात साचले पाणी : रोवणीच्या कामाला येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात सुद्धा पावसाच्या आगमनाने झाली नव्हती. मात्र आषाढी पोर्णिमा संपताच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पुढे एक दोन दिवस असाच पाऊस झाल्यास तालुक्यात सर्वत्र रोवणीला सुरुवात होऊ शकते.सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार पावसाची वाट बघत होते. मृग नाही तर आर्द्र नक्षत्र नक्की पाऊस आणतो अशी शेतकऱ्यांची मान्यता असून त्या अंदाजाने शेती कार्य केले जातात. परंतु यंदा आर्द्र नक्षत्र सुद्धा जवळपास कोरडा गेला. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. दरम्यान पावसाअभावी शेतातील पºहे वाळण्याच्या मार्गावर होते. सोमवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.उंदिराने केली परतफेडयंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाचे वाहन म्हैस होते. म्हशीला पाण्याची गरज असते. परंतु तरी सुद्धा या वाहनाने पावसाला आवाहन केले नाही असे वाटले. त्यानंतर पावसाचे वाहन घोडा बनला. नंतर लगेच आर्द्र नक्षत्राला सुरुवात झाली. घोडा हा तेज धावण्यासाठी ओळखला जातो. त्यानुसार धावत्या वेगाने पाऊस पडण्याची शक्यता होती. परंतु घोड्याचा पावसाशी व शेतीशी तेवढा संबंध येत नाही. म्हणून त्यानेही पावसाचे आवाहन केले नसावे. आषाढी पोर्णिमेच्या दिवशी पावसाचे वाहन उंदिर बनले. उंदिराने यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतीतून भरपूर अन्न ग्रहण केले. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. कदाचित त्याचीच परतफेड करण्यासाठी दमदार पाऊस बसरत आहे.

टॅग्स :Rainपाऊस