शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २७० बालकांना संगोपनाची आस

By admin | Updated: December 24, 2015 02:21 IST

निराधार, निराश्रित, विधवा, परित्यक्त्या व एचआयव्हीग्रस्त अश्या महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी शासनातर्फे बाल संगोपन योजना राबविली जाते.

नरेश रहिले गोंदियानिराधार, निराश्रित, विधवा, परित्यक्त्या व एचआयव्हीग्रस्त अश्या महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी शासनातर्फे बाल संगोपन योजना राबविली जाते. गोंदिया जिल्ह्यातील २७० बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. या बालकांना लाभ देण्यासाठी बालविकास विभागाने १९ लाख ८० हजारांचा निधी मागविला आहे. परंतु वर्ष लोटूनही जिल्ह्यातील या बालकांना संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला नाही. बालसंगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या बालकांना प्रत्येक महिन्याला ४२५ रुपये महिन्याकाठी लाभ देण्यात येतो. त्या बालकांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, त्यांच्या मातांना त्यांचे पोषण करता यावे, यासाठी दर महिन्याला त्या बालकांच्या मातांच्या खात्यांवर हे पैसे टाकले जातात. मुलगा १८ वर्षाचा होईपर्यंत त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. परंतु शासनाने सन २०१५-१६ या वर्षातील १९ लाख ८० हजार रुपये न दिल्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील २७० बालकांना बालसंगोपन योजनेचा निधी देण्यात आला नाही. बालविकास विभागातर्फे १५० बालकांना तर २ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १२० बालकांना अशा एकुण २७० बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. वर्षातून दोन वेळा या योजनेचा निधी बालविकास विभागाला येत असतो. सदर विभागाने मे महिन्यात आयुक्तांना पत्र पाठवून ही त्यांना लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे बालसंगोपण योजनेचा लाभ घेणाऱ्या बालकांचे संगोपण योग्य होत नसल्याची माहिती आहे. या योजनेचा लाभ देणाऱ्या संस्थांना प्रत्येक बालका मागे ७५ रुपये अनुदान मिळतो. निरीक्षणगृह नाहीछोट्या-मोठ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या विधी संघर्षित बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हास्तरावर बाल निरीक्षणगृह असायला हवे. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला १६ वर्षाचा कालावधी लोटूनही गोंदिया जिल्ह्यात विधी संघर्षीत बालकांसाठी निरीक्षणगृह नसल्याने त्या बालकांना भंडारा, नागपूर या ठिकाणी हलवावे लागते. ‘बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना सन २०१५-१६ मधील लाभ देण्यासाठी शासनाकडे १९ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. परंतु अद्याप बाल संगोपन योजनेची राशी आली नाही. - के.बी. रामटेकेपरिविक्षाधिकारी, गोंदिया