शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

येमुला आत्महत्याप्रकरणी अर्जुनीत शांती मार्च

By admin | Updated: February 3, 2016 02:00 IST

अर्जुनी-मोरगाव: हैदराबाद विद्यापीठातील दलित समाजाचा गुणवंत विद्यार्थी रोहित येमुला या विद्यार्थ्यांच्या ...

शेकडोंचा सहभाग: तहसीलदारांना निवेदन अर्जुनी-मोरगाव: हैदराबाद विद्यापीठातील दलित समाजाचा गुणवंत विद्यार्थी रोहित येमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत शांती मार्च काढून त्या पीएडचीधारक विद्यार्थ्यास आत्महत्या करेपर्यंत मानसिक त्रास देणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणी संबंधाने राष्ट्रपतींच्या नावाने असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरी जनतेच्या वतीने जातीयवादी, प्रवृत्तीचा बळी ठरलेल्या रोहित येमुला आत्महत्या प्रकरणी भव्य-दिव्य असा निषेध मोर्चा शनिवारी काढण्यता आला. मोर्चामध्ये तालुक्यातील ठिक-ठिकाणाहून हजारो बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या आत्मीयतेनी सहभागी झाले होते. शांती मोर्चाचे पथ संचालन तालुक्यातील समता सैनिक दलानी केले आहे. शहरातील बौद्ध विहारामध्ये बुद्धवंदना घेऊन शांती मार्चचे प्रस्थान करण्यात आले. दुर्गा चौक, बाजार चौक, बसस्थानक मार्गांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये प्रस्थापित व्यवस्थेचा बळी ठरलेला रोहित येमुला याचे तैलचित्र अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. ज्या समाजामधून आपण आज पुढे आलो तव्दतच समाजातील झोपलेल्यांना जाग यावी असे दिशादर्शित करणाऱ्या तालुक्यातील काही मोजक्यांनीच भव्य अशा शांती मोर्चाचे नियोजन केले होते. हजारो बौद्ध बांधवाचा सहभाग असलेल्या मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या पटांगणात सभेत रुपांतर झाले. प्रा. प्रदीप भानसे यांनी रोहित येमुला या दलीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागची संपूर्ण परिस्थिती विशद केली. सामाजिक कार्यकर्ते सोनदास गणवीर यांनी बुद्धवंदना घेऊन सामुहिक श्रद्धांजलीचे संचालन केले. तहसीलदार बोंबार्डे यांना निवेदन देण्यात आला. गुणवंत असलेल्या एका दलित विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)