शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

बहिष्काराने ‘एपीएमसी’ ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 23:05 IST

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा पणन संचालकांचा आदेश सहकारमंत्र्यांनी तूर्त स्थगित केला असला तरी तो आदेश पूर्णपणे रद्द करावा, यासाठी गोंदियातील व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार

अडतीचा मुद्दा ऐरणीवर : दोन दिवसांत थांबले एक कोटीचे व्यवहार
गोंदिया: शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा पणन संचालकांचा आदेश सहकारमंत्र्यांनी तूर्त स्थगित केला असला तरी तो आदेश पूर्णपणे रद्द करावा, यासाठी गोंदियातील व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदीस नकार दिला. यासाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी (दि.२२) व मंगळवारी (दि.२३) येथील बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवले. यामुळे दोन दिवसात एक कोटींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अडते (दलाल) हे महत्वाची भूमिका निभावतात. अडते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळवून तर देतातच शिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम रोख स्वरूपात देतात. या मोबदल्यात येथे तीन टक्के अडत (दलाली) घेतली जाते. मागील कित्येक वर्षांपासून याच स्वरूपात हे व्यवहार सुरू असून यामुळे शेतकरी, व्यापारी व अडते तिन्ही पक्ष समाधानी होते. मात्र राज्याच्या पणन संचालकांनी शेतकऱ्यांची वर्तमान स्थिती बघता आता अडत शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्याचे आदेश २० डिसेंबर रोजी काढले. यावर गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीने २२ डिसेंबर रोजी सर्व संचालकांची बैठक घेऊन याबाबत व्यापाऱ्यांना बोलावून माहिती दिली. मात्र व्यापाऱ्यांनी हा प्रकार आपल्यावरील अन्याय असल्याचे सांगत लगेच व्यवहार बंद पाडले.
दरम्यान पणनमंत्र्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र आदेशावर स्थगिती न देता तो पूर्णत: रद्द करून बाजार समितीतील व्यवहार पूर्वीप्रमाणेच राहू देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. आपल्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी मंगळवारीही (दि.२३) बाजार समितीत व्यवहार बंदच ठेवले.
यामुळे मात्र शेतकऱ्यांना बाजार समितीतून आल्यापावली परत जावे लागले.
शिवाय व्यापाऱ्यांनी धान खरेदीस नकार दिल्याने शेतकऱ्यांसह शासनाचेही नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीतील आडतिया व्यापारी संघाचे अध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, प्रमोद अग्रवाल, संचालक सुरेश अग्रवाल, निर्मल अग्रवाल, संतोष कायते, नवीन रायली, गिरधारी तांबी, मैनुद्दीन तिगाला आदी अडत्यांनी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)