शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीने संपविला काळविटांचा अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळवीट वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा असून येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. या काळविटच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे.

ठळक मुद्देपाच ते सहा ठिकाणी काळविटांचा अधिवास : प्रत्येक ठिकाणी ७० ते ८० काळवीट

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वन्यप्राण्यांत शेड्यूल वनमध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यात वाढत आहे. आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या काळविटची संख्या ३०० ते ४०० च्या जवळपास आहे.एकीकडे त्यांच्या संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू आहे. मात्र दुसरीकडे काळविटांचे अधिवास असलेले माळरान दिवसेंदिवस कमी होत आहे. वृक्ष लागवडीच्या नादात या काळविटांचे अधिवास वनविभागाने व शासनाने संपविले आहे. या वन्यप्राण्याच्या संरक्षणासाठी माळरान बचावचा नारा सेवा संस्थेने दिला आहे.वन्यजीवांमध्ये आकर्षित करणारा काळवीट प्राणी राज्यात अकोला,अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे आहे. राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळवीट वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा असून येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. या काळविटच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. उजाड जंगलाना त्यांचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जंगलाचे संवर्धन वनविभाग करीत असला तरी याच वनाजवळील माळरानात वावरणाऱ्या काळवीट प्राण्यांचे अधिवास संपत चालले आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेताकडे वळत आहेत. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती.परंतु ती संख्या आता ३०० ते ४०० च्या घरात गेली आहे. या काळविटांची संख्या वाढत असली तरी त्यांना वावरण्यासाठी पुरेसे माळरान नसल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. काळविट संवर्धनासाठी वनविभागाबरोबर निसर्ग मंडळाने उपक्रम सुरू केला होता. या कार्याला सेवा संस्थेने माळरानावर कुरण निर्माण करण्याचे कार्य केले गेल्याने जिल्ह्यात ५ ठिकाणी काळविटांचे अधिवास टिकून आहे.उजाड झालेल्या माळरानावर कुरण उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे परंतु तसे होत नाही. त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून बंधारे बनविले. बोअरवेल तयार केले व टाकेही उभारले.सपाट झालेल्या मैदानावर कुरण तयार करून त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु हे माळरान गावाच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांचा डोळा या प्राण्यांवर असते. काळविटांची वाढती संख्या पाहुन त्यांच्यासाठी पुरेशे माळराण उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा मोर्चा शेताकडेही वळतो. परिणामी शिकार केली जाते. आधी मोठ्या प्रमाणात काळविटांची शिकार व्हायची. परंतु या संदर्भात वनविभागाने व निसर्ग मंडळाने मागील ९ वर्षापासून केलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. सैरावैरा शेताकडे पळणाºया या प्राण्यांची फासे टाकून,विज टाकुन शिकार केली जाते. या काळविंटाकरीता शासनाने माळरान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.अपघाताचे प्रमाण झाले कमीजिल्ह्यात काळवीट पाच ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र या पाचही परिसरातून मोठे रस्ते गेल्यामुळे भ्रमण करताना महिन्याकाठी दोन काळवीट अपघातात मृत्यूमुखी होते. परंतु आता अपघाताचेही प्रमाण कमी झाले आहे. चुलोद, नवरगाव, दतोरा, दागोटोला व अदासी परिसरापासून ते गोरेगाव तालुक्याच्या काही भागात पसरलेल्या क्षेत्रात काळवीट आढळतात.ठेवला जातोय वॉचकाळवीट बरोबर कुरणावर वावरणाऱ्या लांडग्यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एकही न दिसणाऱ्या लांडग्यांची संख्या आता बरीच वाढली आहे. या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने वॉच टॉवर उभारले आहे.त्या टॉवरवरून त्यांच्यावर वॉच ठेवला जात आहे.‘‘ काळविटांसाठी असलेले माळरान संरक्षित क्षेत्र घोषित करून त्याच्या उत्थानासाठी व कुरण निर्मितीसाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. स्वातंत्र संग्राम सैनिक व माजी सैनिकांना वनविभागाच्या माळरानाची जागा न देता त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यात यावी. माळरानाचे जंगल करू नका.- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया.

टॅग्स :forest departmentवनविभाग