शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.

दिलीप गावडे: जल जागृती सप्ताहाचे उद्घाटनगोंदिया : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त १६ मार्च ते २२ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात जिल्हा, तालुका व गावस्तरावर विविध उपक्रमाद्वारे जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये सर्व विभागांनी आपल्या योजना प्रभावीपणे गावस्तरावर पोहोचवितांना पाणी बचतीसाठीही पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन मार्फत बुधवारी (दि.१६) जल जागृती सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, माधुरी पातोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण अंबादे यांचेसह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पुढे बोलताना गावडे यांनी, जल जागृती सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविताना सर्व कार्यालय व ग्रामपंचातीमध्ये जलपूजन करण्यात यावे. तसेच या सप्ताहादरम्यान सर्व ग्रामपंचायतींमध्ये घरगुती पाणी वापराबाबत बचतीचे उपाय, पाण्याची साठवण व संकलन, पाण्याचा अपव्यय टाळणे व तेथील यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यासाठी काळजी घ्यावयाची आहे. तसेच शालेय पातळीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष सभा घेऊन पाणी बचत व पाणी गुणवत्ता या विषयावर मार्गदर्शन करण्यात यावे, शालेयस्तरावर दि.१६ ते २२ मार्च २०१६ दरम्यान जलपूजन, जलदिंडी व जलपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे सांगीतले. जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी, पाणी बचत ही आजच्या काळाची गरज आहे. आपणास मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती आपल्यापेक्षा खूप बिकट आहे. करिता आपणही याबाबत विचार करून आपल्या पुढील पिढीसाठी पाणी पुरेल या उद्देशाने पाणी बचतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना केले.