शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपाने संकलनातून १२.७८ कोटींचे उद्दिष्ट

By admin | Updated: May 13, 2016 01:45 IST

सन २०१६ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली.

४१.६२ टक्के काम पूर्ण : ४० हजार मजुरांच्या हातांना कामगोंदिया : सन २०१६ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली. या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे केले जात आहे. यावर्षीच्या हंगामासाठी ४३ हजार ७९० प्रमाण गोणींचे उद्दिष्ट असून ही उद्दिष्टपूर्ती झाल्यास शासनाला १२.७८ कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.सन २०१६ च्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम गोंदिया विभागातील क्षेत्रीय कर्मचारी व परवानाधारक यांनी त्यांच्या स्तरावर केलेल्या उत्तम नियोजनामुळे उत्कृष्टपणे होत आहे. या वर्षात गोंदिया वन विभागासाठी नेमून दिलेल्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४१.६२ टक्के (१८ हजार २२४ प्रमाण गोणी) तेंदूपानांचे संकलन झाले आहे. तेंदूपाने संकलन कामामुळे जवळपास ४० हजार मजुरांना उन्हाळ्याच्या कालावधीत रोजगार प्राप्त झालेला आहे.सदर हंगाम २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश निघाले होते. मात्र अनेक बिटमध्ये प्रत्यक्ष ३० एप्रिल व २ मेपासून तेंदूपाने तोडणीला सुरूवात झाली. हा हंगात ५ जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जिल्ह्यात तेंदूपाने संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात होते. तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांच्या कामावर गदा येवू नये यासाठी शासनसुद्धा प्रयत्नशील असते. जंगलात वनवा लागू नये, तेंदूपाने नष्ट होवू नये यासाठी वन विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येते. गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, तिरोडा, कोसमतोंडी, सडक-अर्जुनी, कोहमारा, सौंदड, शेरपार, देवरी, भागी-मुल्ला, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, चिचगड अशा एकूण २९ बिटमध्ये तेंदूपत्ता संकलनाची कामे सुरू आहेत.तेंदूपाने संकलन करणे, पुडे सुकविणे, पाणी शिंपणे, बोद भराई करणे आदी संपूर्ण कामासाठी मजुरांना परवानाधारकांच्यामार्फत मजुरी वितरित करण्यात येते. त्यामुळे मजूर कुटुंबांना उन्हाळ्यात एक मोठा आर्थिक आधार प्राप्त झालेला आहे. तेंदूपाने घटक विक्रीपासून मिळालेल्या महसुलातून शासकीय खर्च वजा करून शासनातर्फे मजुरांना शिल्लक रक्कम बोनस स्वरूपात वितरित करण्याचे धोरण आहे. सन २०१४ मधील काहींचे व सन २०१५ या दोन वर्षांचे बोनस वितरण होणे बाकी आहे. बोनस वितरणाची पूर्वप्रक्रिया सध्या सुरू आहे. काही मजुरांचा मृत्यू झाला तर काही मजुरांची बँकेत खाती नसल्यामुळे त्यांचे बोनस बाकी असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. मजुरांनी आपल्या नावे बँक खाते उघडावे व त्याबाबत माहिती परिक्षेत्र कार्यालयात द्यावी, असे आवाहन गोंदिया वन विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मागील वर्षी ८८ टक्केच उद्दिष्टपूर्तीतेंदूपत्ता संकलनासाठी मागील वर्षाच्या हंगामात ४६ हजार प्रमाण गोणींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्या हंगामात ४० हजार ९३६ प्रमाण गोणी झाल्याने ८८ टक्केच उद्दिष्टपूर्ती झाली होती. त्याद्वारे शासनाला ९ कोटी २३ लाख ३६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी तेंदूपाने संकलनापेक्षा मजुरांनी रोजगार हमीच्या कामांना अधिक पसंती दिल्याचे दिसते. तसेच हंगाम संपण्यासाठी आता चार आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. अशात १२.७८ कोटींची उद्दिष्टपूर्ती होणार किंवा नाही, हे सांगणे मात्र कठीम आहे.