शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

दुधात होतेय भेसळ

By admin | Updated: November 15, 2015 01:20 IST

दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात देखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते.

कारवाईची मागणी : रसायनाच्या वापराने शुद्धता हरपली गोंदिया : दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात देखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते. मात्र दूध विक्रेते कमीत कमी वेळात अल्पसा श्रम करून लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल यासाठी दुधात भेसळ करीत असल्याचे चित्र आहे. दुधात भेसळ करून अधिकचा नफा मिळविण्याच्या बेतात आपणच आपल्या जवळील असलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळ करीत आहोत, ही बाब कदाचित विसरली जात आहे. प्रत्येकांची दैनंदिन गरज असलेल्या दुधामध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक द्रव्यांची भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग अशा भेसळखोरांवर कठोर कारवाई करीत नसल्याने दुधात भेसळ करण्याच्या गोरखधंदा परिसरात फोफावत आहे.दूध लहान चिमुकल्या मुलाबाळांसाठी अमृत समझला जातो. डॉक्टरही आजारी रुग्णांना दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये असलेले भरपूर प्रथिने मानवी आरोग्याकरिता लाभदायक असले तरी हिंदु संस्कृतीप्रमाणे दुधाला एक पवित्र द्रव्य म्हणून दुधाचा उपयोग होमहवन, पूजापाठ यात केला जातो. मात्र सध्या बाजारात विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या दुधाच्या शुध्दीकरणावर भेसळखोरीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बऱ्याच दूध व्यवसायिकांनी दुधामध्ये भेसळ करून त्या दुधाची राजरोसपणे विक्री करतात. (तालुका प्रतिनिधी)