कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसाठी प्रशासन मार्ग काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:26+5:30

कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क राहावयाचे आहे. प्रसंगी घाबरुन दूर राहणे यातच गावचे हित आहे. नागरिकांचे हीत व आरोग्याच्या दृष्टीने कुणीही गावाबाहेर जाऊ नये. गावच्या सर्व सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गावात जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतीच्या हंगामासाठी मार्ग काढू, कृषी कर्ज तसेच आर्थिक व्यवहार करता यावे म्हणून गावातच सोय केली जाईल.

The administration will pave the way for the citizens in the containment zone | कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसाठी प्रशासन मार्ग काढणार

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसाठी प्रशासन मार्ग काढणार

Next
ठळक मुद्देएसडीओ : गावातील पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक, विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : गाव कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने ग्रामवासीयांनी आदेशातील नियमांचे तंतोतंत पालन करावे. गावातील जनतेने गावची सीमा ओलांडून गावाबाहेर जाण्याचा प्रयत्न करु नये. कोणत्याही व्यक्तीला गावाबाहेर न जाता आवश्यक सोयी-सुविधांची पुर्तता केली जाईल. खरीप हंगामापूर्वी करण्यात येणारी शेत मशागतीचे कामे करण्यासाठी प्रशासन स्तरावरुन मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल असे उपपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांनी सांगीतले.
ग्राम सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण कोरोना बाधीत आढळल्याने गाव कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशात सिलेझरीवासीयांना कोणतीही अडचण भासू नये व शेतीच्या हंगामात आडकाठी निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
याप्रसंगी तहसीलदार विनोद मेश्राम, खंड विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, पोलीस निरीक्षक महादेव तोंदले, सपोनि. प्रशांत भुते, पोलीस उपनिरीक्षक देवीदास शेवाळे, सरपंच प्रकाश टेंभुर्णे, पोलीस पाटील नंदेश्वर, माजी सरपंच डॉ. धार्मिक गणवीर, आपातकालीन समितीचे सदस्य सुखदेव मेंढे, पी.एच.नंदेश्वर, तलाठी, ग्रामसेवक तथा संपर्क अधिकारी बी.आय.पटणे उपस्थित होते.
पुढे बोलताना सोनाळे यांनी, कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क राहावयाचे आहे. प्रसंगी घाबरुन दूर राहणे यातच गावचे हित आहे. नागरिकांचे हीत व आरोग्याच्या दृष्टीने कुणीही गावाबाहेर जाऊ नये. गावच्या सर्व सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गावात जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतीच्या हंगामासाठी मार्ग काढू, कृषी कर्ज तसेच आर्थिक व्यवहार करता यावे म्हणून गावातच सोय केली जाईल. रब्बी धानाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांचे हीत जपले जाईल. गावातील सर्वाची आरोग्य तपासणी नित्यनेम करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपल्या दारापर्यंत येणार. स्थानिक पदाधिकाºयांनी गावात जागृती करावी. प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनावर मात करावी. सर्वांनी खबरदारी घेऊन एकदिलाने आदेशाचे पालन करावे असेही सांगीतले.

Web Title: The administration will pave the way for the citizens in the containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.