शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणामुळे प्रशासन नरमले

By admin | Updated: March 12, 2016 01:59 IST

नवेगावबांध जलाशयाच्या पाणीचोरी प्रकरणी पाच गावांतील १३ शेतकऱ्यांनी ६ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

मागण्या मान्य : पाचव्या दिवशी १३ शेतकऱ्यांचे उपोषण सुटलेनवेगावबांध : नवेगावबांध जलाशयाच्या पाणीचोरी प्रकरणी पाच गावांतील १३ शेतकऱ्यांनी ६ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्यामुळे उपोषणकर्त्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उपोषण सोडले.नवेगावबांध जलाशयाचे पाणी निस्तार पत्रकानुसार नवेगावबांध, देवलगाव, येरंडी, मुंगली व खोली या पाच गावांना ओलितासाठी लागू आहे. परंतु जलाशयाच्या वरच्या भागातील म्हणजे कोहळीटोली, रांजीटोला, धाबेपवनी, रामपुरी, येलोडी, जांभळी या गावातील काही शेतकऱ्यांनी जलाशयातील पाणी चोरी करुन अवैधपणे रबी धानपिक घ्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी तलावापासून तर आपल्या शेतापर्यंत मोठमोठ्या नाल्या खोदल्या. विजेच्या तारावर आकडे टाकून मोटारपंप सुरू केले. एवढेच नव्हे तर इतर लोकांना देखील पाणी विकण्याचा धंदा सुरू केला. तलावाच्या हद्दीत देखील अतिक्रमण करुन पीक घेण्याचा सपाटा यांनी सुरू केला होता.स्थानिक पाटबंधारे उपविभाग व वीज वितरण कंपनीकडे अनेकदा तक्रारी करून संबंधित पाणी चोरांवर वीज चोरांवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यावर्षी जलाशयातील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे व पाणीचोरी सतत सुरू असल्यामुळे निस्तार हक्क प्राप्त शेतकऱ्यांचे रबी पीक धोक्यात येणार होते. त्यामुळे लाभार्थी पाच गावातील १३ शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. उपोषणकर्त्यांमध्ये धनराज पाटील डोंगरवार, जितेंद्र कापगते, माधोराव डोंगरवार, खुशाल काशिवार, योगराज पुस्तोडे, अमृत खुणे, गुलाब कापगते, रवि लंजे, हिरामण कापगते, भरत कापगते, मार्तंड डोंगरवार, मोहन सोनवाने, बालकदास बोरकर यांचा समावेश होता. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांनुसार अवैध खोदकाम करुन तयार करण्यात आलेला कालवा पूर्णपणे बुजविण्यात येईल व गट क्रमांक १२९२ मधील तलावाच्या परिसरात केलेले अतिक्रमण पूर्णपणे काढून सीमांकन करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले. तसेच तलावातील अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर यानंतर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही विभागाने सांगण्यात आले. तसेच तलाव परिसरातील अवैध विद्युत जोडणी काढण्यात येऊन इतर ग्राहकांना देखील कारवाई करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीतर्फे देण्यात आला.दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाने अवैध कालवा बुजविण्याचे काम सुरू केले आहे. मागण्या मंजूर करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यामुळे मान्यवरांचे हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण समाप्त करण्यात आले. यावेळी माजी आ.दयाराम कापगते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, पालकमंत्र्यांचे सचिव समीर बन्सोडे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन राठोड, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, मुलचंद गुप्ता, नवलकिशोर चांडक, विजय डोये, रतिराम कापगते, विलास कापगते, विलास पुस्तोडे, बाळकृष्ण डोंगरवार, वेल्हाळ डोंगरवार, भगीरथ डोंगरवार यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजले. (वार्ताहर)काही अनुत्तरित प्रश्नसुमारे एक फूट पाण्याची पातळी खाली जाईपर्यंत पाणी चोरण्यात आले, असा विभागाचा अंदाज आहे, याची भरपाई कुणी करावी?पाणी चोरी करण्यासाठी लहान मोठे सुमारे ३० कालवे खोदण्यात आले. सदर बाब गुगल मॅपवर पण दिसून येते. हे कालवे बुजविण्यासाठी पोकलँड व जेसीबी लावण्यात आले. प्रशासनाला सदर कामाला आलेल्या खर्चाची वसुली कोणाकडून करावी?सदर पाण्याची चोरी करण्यासाठी चोरीची वीज देखील वापरण्यात आली. वीज गळतीच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने तो अधिकार इतर ग्राहकांकडून वसूल देखील केला. सदरची अतिरिक्त वसुली कंपनी ग्राहकांना परत करणार काय?