शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी सहा कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील मेडिकलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. सदर वृध्द हा मुंडीपार येथील एका कंपनीत कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात अनेकजण आले. यापैकी ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्देदोन कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : जिल्ह्यात २८ अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.१) आणखी ६ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. या कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया ४, सालेकसा १ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा आता २८ वर पोहचला आहे. तर बुधवारी दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील मेडिकलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. सदर वृध्द हा मुंडीपार येथील एका कंपनीत कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात अनेकजण आले. यापैकी ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.यापैकी बुधवारी आणखी ४ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर दुसरे दोन रुग्ण हे सडक अर्जुनी आणि सालेकसा तालुक्यातील आहे. मृतकाच्या संपर्कात आलेल्या एकूण २२ जणांचे स्वॅब नमुने आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. मात्र बुधवारी दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १०४ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. सध्या स्थितीत जिल्ह्यात एकूण २८ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.३७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अप्राप्तकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण ३२१३ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १३१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ३०८२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर ३७४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या